'बरेली की बर्फी' ठरली चवदार, बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच

आयुषमान खुराना, राजकुमार राव आणि कृती सेनन अभिनीत चित्रपट 'बरेली की बर्फी' प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला आहे. त्यामुळे  'बरेली की बर्फी'ची बॉक्स ऑफिसवर गल्लाभरू कमाई सुरूच असून, दररोज त्यात भरत पडत आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 27, 2017, 03:23 PM IST
'बरेली की बर्फी' ठरली चवदार, बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच title=

मुंबई : आयुषमान खुराना, राजकुमार राव आणि कृती सेनन अभिनीत चित्रपट 'बरेली की बर्फी' प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला आहे. त्यामुळे  'बरेली की बर्फी'ची बॉक्स ऑफिसवर गल्लाभरू कमाई सुरूच असून, दररोज त्यात भरत पडत आहे.

या चित्रपटाने आतापर्यंत २१.६२ कोटी रूपये कमावले आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट इतका आवडला की, पहिल्याच दिवशी २.४२ कोटी रूपयांचा गल्ला जमला. या आठवड्यातही शनिवारपर्यंत चित्रपटाने ३.९५ कोटी रूपये गल्ला जमवत कमाईचा सिलसिला कायम ठेवला. 'बरेली की बर्फी' ने रविवारी तिसऱ्या दिवशीही ५.१५ कोटी रूपये कमाई करत कमाईचा उच्चांक कायम ठेवला. हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रदर्शीत झाला आहे.

चित्रपटाने सोमवारी बॉक्स ऑफिसवर यशस्वीरित्या १.०९ कोटी रूपये कमावले, मंगळवारी २.००, बुधवारी १.६३ कोटी तर, दुसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी १.३० कोटी रूपये खिशात टाकले. चित्रपटाच्या कमाईचा सिलसिला कायम असून, या शनिवारीही कमाईचा आकडा १.७५ कोटी रूपयांवर गेला आहे. त्यामुळे आतापर्यंतची चित्रपटाची कमाई पाहता तो आकडा २१.६२ कोटींच्या घरात गेल्याची चर्चा आहे. पहिल्या दिवासापासूनच 'बरेली की बर्फी'  प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. तेव्हापासून चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावरची पक्कड कायम ठेवली आहे.