मुंबईः भाभीजी घर पर हैं ही एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने नुकतीच सात वर्षे पूर्ण केली आहेत. या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचवेळी, शोसोबतच या शोमधील मजेदार आणि अनोखे पात्र घराघरात लोकप्रिय झाले आहेत, ज्यांना पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येते. शोमधील प्रत्येक पात्र अद्वितीय असले तरी सर्वात मनोरंजक भूमिका अंगूरी भाभीची आहे.
शुभांगी अत्रे या शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारत आहे पण शुभांगीपूर्वी ही भूमिका शिल्पा शिंदेने केली होती. आणि ही भूमिका आयकॉनिक बनवण्याचे श्रेय तिलाच द्यायला हवे. मात्र ही व्यक्तिरेखा केवळ एक वर्ष साकारल्यानंतर शिल्पा शिंदेने शोचा निरोप घेतला.
पण तुम्हाला माहित आहे का की अंगूरी भाभीची ही भूमिका पहिल्यांदा शिल्पा शिंदेला नाही तर टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईला ऑफर झाली होती, पण शोमध्ये रोहितेश गौडचं नाव ऐकताच तिने ही भूमिका करण्यास नकार दिला.
भाभीजी घर पर हैं मधील मनमोहन तिवारी हे आणखी एक मजेदार पात्र आहे. आणि ही व्यक्तिरेखा रोहितेश गौर साकारत आहे. या शोमध्ये अंगूरी भाभी त्यांची पत्नी आहे. जेव्हा रश्मी देसाईला समजलं की, तिला रोहितेश गौडच्या विरुद्ध कास्ट केले जात आहे, तेव्हा तिने नकार दिला.
खरं तर, रश्मी देसाईला वाटलं की रोहितशसोबत तिची जोडी जमणार नाही कारण ती त्याच्यापेक्षा खूपच लहान आहे. त्यामुळेच हे इंटरेस्टिंग कॅरेक्टर आवडल्यानंतरही तिने नकार दिला. नंतर ही भूमिका शिल्पा शिंदेने साकारली आणि ती आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.