मुंबई : हरियाणातील लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस ११ ची स्पर्धक सपना चौधरी लवकरच मोठ्या पडद्यावर आयटम सॉंगयत करताना दिसणार आहे.
'बिग बॉस ११' तून बाहेर पडल्यानंतर तिला सिनेमांसाठी ऑफर येऊ लागल्या होत्या.
सपना, महिंदर सानीवाल यांच्या 'जर्नी ऑफ भांगओवर' सिनेमात 'लव बाइट्स' वर थिरकताना ती दिसणार आहे.
सिनेमाचा दिग्दर्शक महेंद्र सानाीवाल यातून डेब्यू करत आहे.
या सिनेमाचे शुटींग उत्तराखंड आणि हिमाचल अशा सौंदर्यस्थळांवर करण्यात आली आहे. यामध्ये कॉमेडीही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
या सिनेमासाठी सपनाशीच पहिल्यांदा बोलणे सुरू होते. पण तिच्याकडे वेळ नसल्याने ती एका गाण्यातच दिसणार आहे. हा सिनेमा १५ तारखेला रिलीज होणार आहे.