मोनालिसाचा फ्लाईटमध्ये बोल्ड डान्स, VIDEO व्हायरल

भोजपुरी इंडस्ट्रीपासून छोट्या पडद्यावर धमाल करणारी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Updated: Sep 18, 2021, 11:17 AM IST
मोनालिसाचा फ्लाईटमध्ये बोल्ड डान्स, VIDEO व्हायरल

मुंबई : भोजपुरी इंडस्ट्रीपासून छोट्या पडद्यावर धमाल करणारी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती बिकिनी लूकपासून साडीपर्यंत तिचे फोटो आणि ग्लॅमरस व्हिडिओ शेअर करते.

मोनालिसाने आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ती फ्लाइटमध्ये डान्स करताना दिसत आहे. मोनालिसाने स्लीव्हलेस सलवार सूट घातला आहे आणि कांता लगा या गाण्यावर ती डान्स करत आहे. फ्लाइटमधील तिचा हा डान्स व्हिडिओ सगळ्यांच लक्षवेधून घेत आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, मोनालिसा 'कांता लगा' गाण्यावर डान्स करताना जबरदस्त एक्सप्रेशन देत आहे. मोनालिसाच्या इन्स्टाग्रामवर काही तासांत शेअर केलेल्या या व्हिडिओवर हजारो व्ह्यूज आणि लाईक्स आले आहेत. फ्लाइटमध्ये नाचणाऱ्या मोनालिसाच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

मोनालिसा आजकाल चाहत्यांची पहिली पसंती आहे. कधी ती तिच्या डान्स व्हिडीओने तर कधी तिच्या फोटोंने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. मोनालिसा आता तिच्या नवीन शो अनकाही दस्तानमुळे चर्चेत आहे. या शोचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. स्मॉल स्क्रिनवर येणाऱ्या या शोच्या प्रोमोमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.