भोजपुरी चित्रपट दिग्दर्शक शमशाद अहमद यांचे निधन

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक शाद कुमार यांनी मीरा रोड येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतला आहे.

Updated: Nov 11, 2017, 10:29 AM IST
भोजपुरी चित्रपट दिग्दर्शक शमशाद अहमद यांचे निधन  title=

 मुंबई : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक शाद कुमार यांनी मीरा रोड येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे मूळ नाव शमशाद अहमद असे आहे. न्यू सलोनो को- ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये  त्यांच्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेतला आहे.  

शमशाद यांची पत्नी जेव्हा घरी पोहचली तेव्हा तिने त्यांना घरातील खोलीमध्ये लटकताना पाहिले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शमशाद यांच्या सोसायटीचे चेअरमन डॉक्टर आहेत. त्यांनी शमशाद यांची परिस्थिती पाहिली तेव्हा ते मृत होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीपासून शमशाद हे नैराश्यग्रस्त होते. पूर्वीच्या काही प्रोजेक्टमध्ये त्यांना नुकसान झाले होते.  

 २४  नोव्हेंबरला येणार आहे नवा सिनेमा  
 इक लैला, तीन छैला’’, ‘‘भईल तोहरा से प्यार’’, ‘‘तुम्हारे प्यार की कसम’’ अशा अनेक भोजपुरी सिनेमांचे शमशाद यांनी दिग्दर्शन केले आहे. 'स्वर्ग' हा त्यांचा आगामी चित्रपट २४ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. दिग्दर्शनापूर्वी त्यांनी भोजपुरी चित्रपटांमध्ये सहाय्यक फोटोग्राफर म्हणून काम केले आहे.