Isha Malviya And Samarth Jurel Breakup : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली जोडी म्हणून ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांना पाहिले जाते. ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल या दोघांनी बिग बॉसच्या घरात एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. या दोघांनी बिग बॉसच्या घरात प्रेमाची कबुली दिली होती. विशेष म्हणजे बिग बॉसमध्ये ईशा मालवीय, समर्थ जुरेल आणि अभिषेक यांचा लव्ह ट्रँगलही पाहायला मिळाला. पण आता ईशा-समर्थचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे.
समर्थ जुरेलने नुकतंच 'पिंकविला'शी संवाद साधला. यावेळी त्याने ईशासोबत ब्रेकअप झाल्याची कबुली दिली. "मी आणि ईशा आता एकमेकांना डेट करत नाही. आम्ही दोघेही आता एकत्र नाही. आमचा ब्रेकअप झाला आहे. मी तुम्हाला सध्या तरी इतकंच सांगू शकतो. याबद्दल मला जास्त बोलता येणार नाही", असे समर्थने सांगितले. याआधीही अनेक मुलाखतींमध्ये समर्थने ब्रेकअपबद्दल जाहीर केले होते. तर 'फ्री प्रेस जनरल'शी बोलताना समर्थने "ईशा आणि मी आता एकत्र नाही. आमचं ब्रेकअप झालं आहे. काय घडलं याबद्दल मी आता काहीच सांगणार नाही. फक्त एवढेच सांगेन आता आम्ही एकत्र नाही", असे म्हटले होते.
ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांचे ब्रेकअप महिन्याभरापूर्वीच झाल्याचे बोललं जात आहे. त्या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरुनही अनफॉलो केले आहे. त्यामुळे आता ईशा आणि समर्थ एकत्र नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. समर्थने व्हॅलेंटाईन डे निमित्त केलेल्या पोस्टनंतर त्याचा आणि ईशाचा ब्रेकअप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांची पहिली भेट ‘उडारियां’ मालिकेच्या सेटवर झाली होती. याच मालिकेच्या सेटवर त्यांची छान मैत्री झाली. यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. समर्थ हा बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. तर अभिषेक कुमार हा ईशाचा एक्स बॉयफ्रेंड आधीच बिग बॉसच्या घरात होता. त्यामुळे निर्मात्यांनी समर्थला वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात पाठवलं. ईशाने सुरुवातीला समर्थला तिचा प्रियकर म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता, मात्र त्यानंतर तिने या नात्याचा अधिकृतपणे स्वीकार केला. पण हा कार्यक्रम संपण्यापूर्वी अभिषेक आणि समर्थची घट्ट मैत्री झाली होती.