मुंबई : OTT च्या जगाने सर्व लहान-मोठ्या कलाकारांना एक व्यासपीठ दिले आहे, जिथे ते त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करताना दिसतात. राजसी वर्माने ओटीटीवरील 'चरमसुख', 'बायोलॉजी टीचर' आणि 'पलंगटोड डबल धमाका' यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
2019 मध्ये राजसी पहिल्यांदा प्रकाशझोतात आली जेव्हा ती उल्लू अॅपवर 'चरमसुख आणि 'चरमसुख सौतेला प्यार' मध्ये दिसली.
मुंबईत जन्मलेली आणि वाढलेली राजसी वर्माने 2016 मध्ये 'बेमन लव्ह' चित्रपट केला होता. याआधी 2011 मध्ये ती 'दिया और बाती हम' या टीव्ही शोमध्ये दिसली होती. या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
याशिवाय राजसीने 'क्राइम पेट्रोल', 'सावधान इंडिया', 'ये है मोहब्बतें', 'कसम तेरे प्यार की', 'सुहानी सी एक लडकी' आणि 'ए जिंदगी' सारख्या शोमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.
2018 मध्ये राजसी वर्मा विक्रम भट्टच्या 'तंत्र' या वेब सीरिजमध्येही दिसली होती. काही प्रमाणात इथूनच ओटीटीपर्यंत तिच्या कारकिर्दीची गाडी पुढे सरकली.
सरला भाभीच्या भूमिकेने राजसी वर्माला ओटीटीवर लोकप्रियता मिळवून दिली. या व्यक्तिरेखेसाठी राजसीने बोल्डनेसच्य़ा सर्व मर्य़ादा ओलांडल्या.
राजसी तिच्या कुटुंबासह मुंबईत राहते. तिचे वडील शिवकुमार वर्मा हे देखील अभिनेते आहेत. टीव्हीवरील अनेक लोकप्रिय कार्यक्रमांचा ते भाग आहे. शिवकुमार वर्मा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्येही दिसले आहे
राजसी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. एका रिपोर्टनुसार ती दरमहा 8-10 लाख रुपये कमावते.