Laal Singh Chadda: बॉलीवूड अभिनेता आमीर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हॉलिवूडमध्ये नव्वदच्या दशकात 'फॉरेस्ट गम्प' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात प्रसिद्ध अभिनेते टॉम हॅक्स यांनी फॉरेस्ट गम्प ही मध्यवर्ती भुमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयातील लकब आणि फॉरेस्ट गम्प या व्यक्तिरेखेतील जिवंतपणा यामुळे तेव्हाच्या समीक्षकांनी त्यांच्या अभिनयाला विशेष दाद दिली होती.
आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रदर्शित झाला असला तरी रिमेक म्हणून या चित्रपटाने पाश्चात्त्य सिनेमाच्या वातावरणाचे, जीवनशैलीचे केलेले हिंदीकरण अगदी आमीर खानच्या लाल सिंग चद्ढा या पात्रासह सपशेल फसले असल्याचं समीक्षकांचे म्हणणे आहे.
अभिनय आणि नक्कल यांतील अंतर हा चित्रपट मोडून काढू शकला नाही. टॉम हॅक्स यांनी साकारलेल्या पात्राची हूबेहूब नक्कल केल्यासारखी वाटते. आमीर खान आणि करिना कपूर या वयात अठरा वर्षांच्या तरूण-तरूणीप्रमाणे चित्रपटात प्रेमात वैगेरे पडतात, हे चित्रही अतिरंजित वाटते. फॉरेस्ट गम्प यांच्या देहबोलीपासून ते त्यांच्या बाह्यरूपापर्यंत सगळ्यांची नक्कल म्हणजे लाल सिंग चद्ढा हे पात्र ठरले आहे, असेही अनेकांचे म्हणणे आहे.
सुप्रसिद्ध ट्रेण्ड विश्लेषक तरन आदर्श यांनी नुकत्याच दिलेल्या रिव्ह्यूमधून 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाला दोन स्टार दिले आहेत. त्यांच्या म्हण्यानुसार या चित्रपटातून आमीरने कमबॅक केला. आमीरला या चित्रपटातून आपल्या अभिनयाचे कौशल्य खुलवता आले असते. पण आमीरने या चित्रपटातून ती चांगली संधी त्याच्या हातातून सुटली आहे. पटकथा अजून चांगल्या पद्धतीने रंगवता आली असती परंतु त्यातील पटकथा मागे पडते.
#OneWordReview...#LaalSinghChaddha : UNBEARABLE.
Rating:
A golden opportunity miss. Even #AmirKhan star-power cannot save this ship from sinking… EPIC DISAPPOINTMENT. #LaalSinghChaddhaReview pic.twitter.com/7ORENXslZY— Taran Adarsh (@anup_frenzy) August 11, 2022
'फॉरेस्ट गम्प' ही मुळ कथा जिद्दीची आणि आत्मविश्वासाची कथा सांगते. आपल्या व्यंगावरही मात करत आत्मविश्वासाने पुढे जाणाऱ्या फॉरेस्ट गम्प यांची कथा जगाभरातून एका प्रेरणा म्हणून पाहिली गेली. परंतु 'लाल सिंग चड्ढा'च्या निमित्ताने मात्र गाणी, रोमान्स आणि मेलेड्रामा व्यक्तिरिक्त बॉलीवूडचा तोचतोचपणा 'लाल सिंग चड्ढा'मधून प्रेक्षकांपुढे आल्याने हा चित्रपट प्रेक्षकांची पुर्णतः निराशा करतो.