वयाच्या 6 व्या वर्षी व्हायचं होतं शेतकरी; 50 वर्षांनी अभिनेत्याचं स्वप्न पूर्ण

लहानपणी प्रत्येकजण काहीतरी स्वप्न पाहत असतो... 

Updated: Oct 12, 2021, 08:35 AM IST
वयाच्या 6 व्या वर्षी व्हायचं होतं शेतकरी; 50 वर्षांनी अभिनेत्याचं स्वप्न पूर्ण  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लहानपणी आपण सर्वजण काही स्वप्न पाहतो. मोठं होऊन असं होणार, हे काम करणार वगैरे वगैरे. बॉलिवूडमधील एका हँडसम हंक अभिनेत्यानंही त्याच्या लहानपणी अशीच स्वप्न पाहिली होती. जे स्वप्न अखेर 50 वर्षांनंतर साकारल झालं आणि या अभिनेत्यानं ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअरही केली.

या अभिनेत्यानं पाहिलेलं स्वप्न होतं शेतकरी होण्याचं. साऱ्या जगाचा पोशिंदा होण्याचं स्वप्न पाहणारा हा अभिनेता आहे मिलिंद सोमण. फिटनेस फ्रिक अभिनेता म्हणून मिलिंदची ओळख. कलाविश्वात सक्रिय असणारा हा अभिनेता कायमच निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. मग ती त्याची जीवनशैली असो किंवा एखादा निर्णय.

मिलिंदनं नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या नव्या इनिंगविषयी चाहत्यांना माहिती दिली. ‘वयाच्या 6 व्या वर्षी शेतकरी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, आता 50 वर्षांनी ते साकार होत आहे’, असं कॅप्शन लिहित मिलिंदनं त्याच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. जिथं त्याचा पेहराव ग्रामीण भागाकडला दिसत आहे. सोबतच त्यानं एक व्हिडीओही शेअर केला आहे. जिथं तो भोपळा उडवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मिलिंदच्या चेहऱ्यावर असणारा आनंद खूप काही सांगून जात आहे.

मिलिंदचं शेती प्रेम ही काही नवी बाब नाही. यापूर्वीही त्यानं आणि त्याच्या पत्नीनं अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी लावलेल्या फळभाज्या, फळं या साऱ्याचीच माहिती दिली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x