करिअरपुढं लग्न म्हणजे...; ऐश्वर्यानं फार आधीच स्पष्ट केलेली भूमिका

Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनच्या खासगी आयुष्यावरून बऱ्याच चर्चा झाल्या. या सर्व चर्चांमध्ये सध्या तिच्या वैवाहिक नात्यानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.  

सायली पाटील | Updated: Aug 26, 2024, 03:12 PM IST
करिअरपुढं लग्न म्हणजे...; ऐश्वर्यानं फार आधीच स्पष्ट केलेली भूमिका  title=
bollywood actress Aishwarya Rai Bachchan on not loosing herself to marriage and family life

Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन ही जोडी अनेकांच्याच आवडीची. बी टाऊनमधील प्रतिष्ठीत कुटुंबांपैकी एक असणाऱ्या बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या तिच्या कलाजगतातील कारकिर्दीमुळंही कायमच चर्चेच असते. हीच ऐश्वर्या सध्या मात्र एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. 

कथित स्वरुपात म्हटलं जात असल्यानुसार ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात सारंकाही आलबेल नाहीय. दरम्यान या दोन्ही कलाकारांकडून किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडूनही या नात्यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरीही काही कार्यक्रमांमध्ये त्यांची एकमेकांशिवाय असणारी उपस्थिती खूप काही बोलून जात आहे. 

करिअरपुढे लग्न... 

एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्याला तिच्या करिअर आणि वैवाहिक जीवनाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ऐश्वर्याच्या लग्नाला काहीच वर्ष पार पडली होती. कौटुंबिय आयुष्यामध्ये करिअर मागे पडेल का? असा प्रश्न तिला त्यावेळी विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना ऐश्वर्यानंही आपण वैवाहिक जीवनाचा आनंद घेत असल्याचं म्हणत, असं असलं तरीही लग्न आणि कौटुंबिक जीवनापुढं करिअर मागे पडण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली होती. 

हेसुद्धा वाचा : निंदनीय! महिलांवरील अत्याचारांमध्ये 'या' देशांनी रचला नकोसा विक्रम 

प्रेमाच्या नात्याची सुरुवात, लग्न आणि...

2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याची सुरुवात झाली. पुढं त्यांनी लग्न केलं आणि त्यांच्या या नात्यात एका मुलीचाही जन्म झाला. इथं ऐश्वर्यानं हळुहळू तिच्या कौटुंबीक जीवनाला प्राधान्य देत ती काही प्रमाणात रुपेरी पडद्यापासून दुरावली. पण, 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटाच्या माध्यमातून ऐश्वर्यानं पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत सर्वांच्याच नजरा वळवल्या होत्या. ऐश्वर्या सध्या फार कमी चित्रपटांमध्ये झळकत असली तरीही विविध ब्रँड एंडॉर्समेंट आणि तत्सम कारणांनी ती फॅशन इंडस्ट्रीत कायमच चर्चेचा विषय ठरते असं म्हणायला हरकत नाही.