गरोदरपणाबाबत बिपाशा बासू असं काही म्हणालीये, बसला सर्वांना धक्का

चित्रपटांमध्ये सक्रिय नसली, तरीही ती तिच्या वैवाहिक जीवनात मात्र अतिशय सुखात आणि आनंदात आहे

Updated: Oct 25, 2021, 12:33 PM IST
गरोदरपणाबाबत बिपाशा बासू असं काही म्हणालीये, बसला सर्वांना धक्का
बिपाशा बासू

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली, तरीही ती तिच्या वैवाहिक जीवनात मात्र अतिशय सुखात आणि आनंदात आहे. सोशल मीडिया पोस्ट पाहता हेच लक्षात येत आहे. करणसिंग ग्रोवर याच्यासह बिपाशा तिच्या संसारात रमली असून, आता तिला गरोदरपणाविषयीचे प्रश्नही विचारले जाऊ लागले आहेत. इतकंच नव्हे, तर बिपाशाच्या गरोदरपणाच्या चर्चांनी जोरही धरला आहे.

सर्व चर्चा आणि या प्रश्नांच्या गराड्यात आता खुद्द बिपाशानंच मोठा खुलासा केला आहे. याला कारण ठरत आहे बिपाशाचं वाढलेलं वजन. बिपाशानं याबाबत सांगताना म्हटलं, ‘मला ठाऊक आहे की मी फिटनेससाठी ओळखली जाते. पण, असेही काही क्षण येतात ज्यावेळी मीसुद्धा काही गोष्टींवर लक्ष देत नाही. मी अनहेल्दी होतेय याचा असा अर्थ होतच नाही. पण, आता चर्चा (गरोदरपणाच्या) होतच राहणार आहेत जोवर मला खरोखरच बाळ होत नाही.’

वयाच्या 42 व्या वर्षी बिपानानं म्हटलंय की चाहत्यांकडून गरोदरपणाच्या होणाऱ्या चर्चा या जणू त्यांच्या शुभेच्छाच आहेत. हे व्हायचंच आहे ते होणारच.... वारंवार होणाऱ्या चर्चांचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही. ते (चाहते) माझ्याबाबत काही वाईट बोलत नाहीयेत याबाबत तिनं समाधानही व्यक्त केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मालदिव येथए बिपाशा तिच्या पतीसह सुट्टीसाठी गेली होती. सोशल मीडियावर या ‘मंकी कपल’ने त्यांच्या या खास क्षणांचे काही फोटोही चाहत्यांसाठी शेअर केले. ज्यानंतरच बिपाशाच्या गरोदरपणाच्या चर्चांना उधाण आलं होतं.