माधुरीनं देशाबद्दल केलेलं वक्तव्य तुम्हाला काहीसं निराश करेल, ती असं का म्हणाली?

हे दिवस तिच्या कारकिर्दीतील अतिशय महत्त्वाचे होते. पण, लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली.

Updated: Mar 1, 2022, 01:54 PM IST
माधुरीनं देशाबद्दल केलेलं वक्तव्य तुम्हाला काहीसं निराश करेल, ती असं का म्हणाली?  title=

मुंबई : माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिनं 90 च्या दशकापासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. चित्रपटात तिनं साकारलेली प्रत्येक भूमिका ही माधुरीनं तितक्याच आत्मियतेनं साकारली. भारतीय चित्रपट जगतामध्ये तिला मिळालेली लोकप्रियता ही इतर कोणालाही लाजवेल अशीच.

अशीच ही ‘धकधक गर्ल’, एका वळणावर परदेशात गेली. हे दिवस तिच्या कारकिर्दीतील अतिशय महत्त्वाचे होते. पण, लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली.

परदेशात गेल्यानंतर माधुरीनं बऱ्याच बदलांचा सामना केला. या बदलाबद्दल ती अतिशय लक्षवेधी वक्तव्य करुन गेली आणि सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.

हल्लीच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं भारतात एक सेलिब्रिटी म्हणून जगल्यानंतर अमेरिकेत तिचं आयुष्य कसं होतं, असा प्रश्न तिला करण्यात आला. ज्याचं उत्तर देताना माधुरी म्हणाली...

‘भारतात चित्रीकरण सुरु असताना पालकही सेटवर येत होते. प्रत्येक वेळी कमीत कमी 20 लोकं आजुबाजूला होतीच’, असं ती म्हणाली.

आपण लहानाचे मोठे अतिशय सुरक्षित वातावरणात झालो. त्यावेळी आई-बाबा कायम सोबत असायचे. पण, लग्नानंतर मात्र माझे निर्णय मी स्वत: घेऊ लागली.

 

अमेरिकेत राहताना मी खुप काही शिकले, आयुष्याशी निगडीत निर्णय घ्यायला शिकले. भारतात जवळपास 20 लोकं तरी होते. पण, अमेरिकेत मी फार स्वातंत्र्यात होते’, असं ती म्हणाली.

 

माधुरीनं 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली. 2002 मध्ये तिनं अभिनयातून पूर्णत: विश्रांती घेतली. 2007 मध्ये तिनं ‘आजा नच ले’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

 

यावेळी ती संपूर्ण कुटुंबासह भारतात परतली आणि पुन्हा एकदा कला जगतामध्ये नव्या जोमानं उतरली.