गर्लफ्रेंडमुळं दिग्दर्शकानं मला.... ; मल्लिका शेरावतचा खळबळजनक खुलासा

मल्लिका शेरावत सध्या एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत आहे.

Updated: Sep 17, 2021, 07:40 AM IST
गर्लफ्रेंडमुळं दिग्दर्शकानं मला.... ; मल्लिका शेरावतचा खळबळजनक खुलासा
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मादक सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत आहे. कारण आहे मल्लिकाची 'नकाब' ही वेब सीरिज आणि त्यानिमित्तानं विविध मुलाखतींमध्ये होणारे खुलासे.  दीर्घ काळानंतर मल्लिका या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळं सहाजिकत त्याबाबत बरीच उत्सुकता आणि कुतूहल पाहायला मिळत आहे. 

मल्लिका ही तिच्या चित्रपटांतील बोल्ड अंदाजासोबत काही उथळ आणि अनेकदा स्फोटक वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. हल्लीच तिनं एक नवा खुलासा केला आहे. जिथं, एका दिग्दर्शकानं त्याच्या प्रेयसीमुळ आपल्याला 'वेलकम बॅक' या चित्रपटात स्थान न दिल्याचं सांगितलं. आपल्याऐवजी दिग्दर्शकानं ती भूमिका त्याच्या प्रेयसीला दिली, असं सांगत मल्लिकानं मनातील खदखद बाहेर काढली. 

अनेक हिरोंकडून वन नाईट स्टेची ऑफर' अभिनेत्री मल्लिका शेरावतचं धक्कादायक वक्तव्य

दरम्यानच्या काळात मल्लिका हिंदी चित्रपटसृष्टीतील कास्टींग काऊच आणि नेपोटीझम अर्थात घराणेशाहीच्या मुद्द्यावरही बोलली. आपल्याबाबत अनेकांनीच बरेच पूर्वग्रह मनाशी बाळगले असं सांगताना जे तू पडद्यावर करतेस ते खासगी आयुष्यात करण्यास हरकत काय असा प्रश्न आपल्याला अनेकांनी केल्याचा कुलासा मल्लिकानं केला होता.