भाऊ असतानाही Raveena Tondon कडून वडिलांवर अंत्यसंस्कार; अखेरचा निरोप कठीण...

रवीनानं वडिलांना अखेरचा निरोप देणारी एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली

Updated: Feb 11, 2022, 04:54 PM IST
भाऊ असतानाही Raveena Tondon कडून वडिलांवर अंत्यसंस्कार; अखेरचा निरोप कठीण...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये 90 चा काळ गाजवणारी अभिनेत्री  रवीना टंडन (Raveena Tandon) हिच्या वडिलांचं, दिग्दर्शक रवी टंडन यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवीना आणि तिच्या वडिलांचं नातं सर्वांनाच ठाऊक आहे. 

रवीनानं वडिलांना अखेरचा निरोप देणारी एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली. इतकंच नव्हे, तर अंत्यसंस्कारातील सर्व विधी तिनंच पूर्ण केले. 

रवीना आणि राजीव अशी दोन मुलं रवी टंडन यांना झाली. मुलगा असतानाही रवीनानं वडिलांचे अंत्यविधी करणं ही बाब सर्वांच्या नजरा वळवून गेली. 

पण, मुलगाच या विधी करु शततो, हीच परंपरा तिनं इथे मोडली. 

रवीनाचा भाऊ, राजीव टंडनसुद्धा वडिलांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. पण, त्यांचंही वाढतं वय आणि काही आरोग्याच्या तक्रारींमुळे ते अंत्यविधी करु शकले नाहीत. 

अखेर रवीनानंच तिथं पुढाकार घेत आपल्या वडिलांना शेवटचा निरोप दिला. 

ज्येष्ठ दिग्दर्शक रवी टंडन मागील काही दिवसांपासून वाढत्या वयामुळं अनेक आजारांशी झुंज देत होते. 

अखेर शुक्रवारी पहाटे त्यांनी या जगाचा निरोप घेतला. चित्रपट निर्मीतीमध्येही ते सक्रिय होते. 

त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये 'खेल खेल में', 'अनहोनी', 'नजराना', 'मजबूर', 'खुद्दार' 'मजबूर' आणि 'जिंदगी' या चित्रपटांचं नाव समाविष्ट आहे.