Sunny Leone : "एका रात्रीचे..." विचित्र प्रश्न ऐकताच सनी लिओनीकडून पत्रकाराच्या सणसणीत चपराक

पूर्वायुष्याचा संदर्भ देत तिला प्रश्न केला गेला आणि सनी एका क्षणात संतापली, पुढे जे झालं त्याचा विचारही कुणी केला नसेल...

Updated: Nov 24, 2022, 02:10 PM IST
Sunny Leone : "एका रात्रीचे..." विचित्र प्रश्न ऐकताच सनी लिओनीकडून पत्रकाराच्या सणसणीत चपराक title=
bollywood actress sunny leone One night a journalist slap after hearing the strange question nz

Sunny Leone : बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असण्यासोबतच सनी लिओन (Sunny Leone) तिच्या सोशल मीडियावरही (Social Media) खूप सक्रिय (Active) आहे. तुम्हाला माहिती असेलच की सनी लिओनी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत (Adult Film Industry) काम करायची. त्यानंतर सनीने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. तिच्या थेट अभिनेत्री म्हणून येण्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच सनी लिओनीने पॉर्न इंडस्ट्री सोडली. आणि नंतर त्यात कधी काम केले नाही, तरीही काही लोक तिला त्याच घाणेरड्या नजरेने पाहतात. (bollywood actress sunny leone One night a journalist slap after hearing the strange question nz)

त्या क्षेत्राकडे मागे वळून पाहिले नाही

जेव्हापासून ती बॉलिवूडमध्ये आली तेव्हापासूनच तिने अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत काम करणे सोडले. तिनं कधीच त्या क्षेत्राकडे मागे वळून पाहिले नाही. आणि जेव्हा कोणी तिला अडल्ट फिल्म इंडस्ट्रीबद्दल प्रश्न विचारतो तेव्हा सनी त्यावर चांगलच उत्तर देते. सनीने आपल्या मेहनतीने चित्रपटांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकदा एका पत्रकाराच्या घाणेरड्या प्रश्नावर सनी लिओन भडकली. आणि त्यानंतर बराच गदारोळ झाला.

नेमकं झालं तरी काय?

ही गोष्ट 2016 सालची आहे. तोपर्यंत सनी लिओनी बॉलिवूडमध्ये एक मोठे नाव बनली होती. त्याचा ‘रागिनी एमएमएस २’ (Ragini MMS 2) हा चित्रपट सुपरहिट (Superhit Movies) ठरला होता. आणि तिथून तिला नवीन नाव मिळाले बेबी डॉल (Baby Doll). त्याचवेळी सनी सुरतमध्ये ‘प्ले होली विथ सनी लिओन’ (Play Holi With Sunny Leone) या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी गेली होती त्याच कार्यक्रमामध्ये एका पत्रकाराने (Reporter) तिला प्रश्न विचारला की, आधी तू अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत काम करायची पण आता बॉलिवूडमध्ये काम करतेस. मग आता ती एका रात्रीसाठी किती पैसे घेते? सनी लिओनीने तो प्रश्न ऐकताच चिडली, त्यानंतर तिने पत्रकाराच्या कानाखाली लगावली. यानंतर या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला.

आजही लोक घाणेरड्या नजरेने पाहतात

सनी लिओनीने अनेक वर्षांपूर्वी अडल्ट फिल्म इंडस्ट्री सोडली होती आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. पण इतक्या वर्षांनंतरही लोक तिच्याकडे त्याच घाणेरड्या नजरेने पाहतात. सनी लिओनीने जिस्म 2 (Jism 2) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आज तिचे बड्या अभिनेत्रींच्या यादीत येते.