मुंबई : अभिनेता शाहिद कपूर याची बहिण सना कपूर हिचा शुभविवाह काही दिवसांपूर्वीच पार पडला. अतिशय छोटेखानी आणि तितकाच सुरेख असा हा विवाहसोहळा सर्वांची मनं जिंकून गेला. पण, सोबतच एक प्रश्नही काहींनी मांडला. हा प्रश्न होता, शाहिदचा विवाहसोहळा अतिशय थाटामाटात पार पडलेला असतानाच त्याच्या बहिणीचं लग्न थोडक्यातच का उरकलं? (shahid kapoor sanah wedding )
सनाई आई, म्हणजेच शाहिद कपूरच्या सावत्र आईनं हे चित्र स्पष्ट करुन सांगितलं. एका मुलाखतीमध्ये त्यांनी लेकिच्या लग्नासोबतच आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवरही टीका केली.
'ही सर्वस्वी मयांक आणि सनाची कल्पना होती. त्यांना काहीतरी नवं करायचं होतं, तेव्हाच आम्ही चौघांनी (Pankaj Kapur, Supriya Pathak, Manoj Pahwa, Seema Pahwa)यांनी हा सोहळा कसा असावा याचा विचार केला होता.
त्यांना लग्न कसं करायचंय हे त्यांनीच ठरवलं होतं. ते निर्णयावर ठाम होते. आम्हाला फक्त कुटुंब आणि हक्काच्या, प्रेमाच्या आणि आपल्या लोकांसमोर फक्त वचनं घ्यायचीयेत.... बाकी काहीच करायचं नाहीये', असं सनानं सांगितल्याचं पाठक यांनी स्पष्ट केलं.
ते लग्न नसून, एक सोहळा होता जो सुरेखरित्या पार पडला असंही त्या म्हणाल्या. सुप्रिया पाठक यांनी पंकज कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. पंकज आधीपासूनच विवाहित होते. या लग्नातूनच त्यांना शाहिद हा मुलगा झाला.
तर, सुप्रिया आणि पंकज यांना रुहान आणि सना अशी दोन अपत्ये. नात्यांची ही गुंतागुंत असतानाही कधीच या नात्यांमध्ये दुरावा दिसला नाही. सुप्रिया यांना पंकज यांच्यासोबत मिळून नवं घर घेताना बरीच वर्षे अडचणी आल्या.
आर्थिक पाठबळाच्या अभावी अनेक वर्षे त्यांचं स्वत:च्या घराचं स्वप्न अपूर्ण राहिलं. पण, अखेरीस अनेक वर्षे भाडेतत्त्वावरील घरात राहिल्यानंतर त्यांनी स्वत:च्या घराचं स्वप्न साकार केलंच.
सहसा सेलिब्रिटींचं आयुष्य म्हणजे गजगंड पैसा आणि कधीही न संपणारी लोकप्रियता अशीच समीकरणं आपल्या डोक्यात असतात. पण, सुप्रिया पाठक किंवा एकंदरच शाहिद कपूरच्या या कुटुंबासोबत मात्र असं काही घडलं नसल्याचं दिसलं.