आर्यन खानच्या करिअरची सुरुवात; बॉलिवूडमध्ये मिळाला मोठा ब्रेक!

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा आर्यन खान चर्चेत आला आहे 

Updated: Dec 7, 2022, 02:02 AM IST
आर्यन खानच्या करिअरची सुरुवात; बॉलिवूडमध्ये मिळाला मोठा ब्रेक!

Bollywood News : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात चर्चेत आला होता. मात्र आर्यन खानला एनसीबीने क्लीन चीट दिली आहे. कोणतेही पुरावे न सापडल्याने आर्यनला सोडून देण्यात आलं. आता पुन्हा एकदा आर्यन खान चर्चेत आला आहे त्याचं कारण म्हणजे तो बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. (bollywood aryan khan announced his directorial debut with father shahrukh khan red chillies latest marath News)

आर्यन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती. आर्यनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये, लिखाण पूर्ण झालं असून असून आता अॅक्शन म्हणण्यासाठी उत्सुकता लागली असल्याचं आर्यन खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

आर्यन खान बॉलिवूडमध्ये एक अभिनेता म्हणून पदार्पण करेल असं वाटत होतं. मात्र आर्यनने पडद्याच्या मागचा मुख्य रोल करण्याचा रस्ता निवडला आहे. आर्यनचा हा प्रोजेक्ट ओटीटीच्या माध्यमातून पडद्यावर दिसणार आहे. आर्यन खान हा 27 वर्षांचा असून त्याने स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स, युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया, 2020 मध्ये बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, सिनेमॅटिक आर्ट्स आणि टेलिव्हिजन प्रॉडक्शन पदवी प्राप्त केली. 

आर्यन खान आणि सुहाना खान दोघेही OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. झोया अख्तरच्या 'आर्चीज' या चित्रपटातून सुहाना खान पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. खान कुटुंबासाठी 2023 हे वर्ष खूप खास असेल. कारण तब्बल 4 वर्षांनंतर शाहरुख खानही पडद्यावर झळकताना दिसत आहे.