सेन्सॉर कॉपी झाली होती लीक, निर्मात्यांना रिलीज डेट आधीच प्रदर्शित करावा लागला 'हा' प्रसिद्ध सिनेमा

ऑनलाइन टॉरेंट साइट्सवर या चित्रपटांच्या लीकमुळे बॉलिवूडला हजारो कोटींचं नुकसान झालं आहे. 

Updated: Sep 1, 2022, 10:48 PM IST
सेन्सॉर कॉपी झाली होती लीक, निर्मात्यांना रिलीज डेट आधीच प्रदर्शित करावा लागला 'हा' प्रसिद्ध सिनेमा title=

मुंबई : चित्रपटांच्या सुरुवातीच्या ऑनलाइन क्रेझ दरम्यान, असं देखील घडलं आहे की, काहीवेळा चित्रपट चित्रपटगृहात येण्यापूर्वी लीक होऊन थेट लोकांपर्यंत पोहोचले. ऑनलाइन टॉरेंट साइट्सवर या चित्रपटांच्या लीकमुळे बॉलिवूडला हजारो कोटींचं नुकसान झालं आहे. पण जुलै 2016 मध्ये, बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली जेव्हा निर्माता-दिग्दर्शक इंद्र कुमार यांचा प्रचंड बजेट अॅडल्ट कॉमेडी चित्रपट ग्रेट ग्रँड मस्ती रिलीज होण्याच्या 17 दिवस आधी लीक झाला.

आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे ऑनलाइन लीक झालेल्या कॉपीवर सेन्सॉर बोर्डाची कॉपी असल्याचा वॉटर मार्क होता. यापूर्वी जून 2016 मध्ये सेन्सॉर बोर्डाच्या वॉटर मार्कसह उडता पंजाब या चित्रपटाची कॉपीही ऑनलाइन लीक झाली होती. फक्त चांगली गोष्ट म्हणजे शाहिद कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर आणि दिलजीत दोसांझचा हा चित्रपट रिलीज होण्याच्या एक दिवस आधी लीक झाला होता.

ग्रँड मस्ती त्या दिवसांत चर्चेत होता कारण त्याआधी या मालिकेतील मस्ती (2004) आणि ग्रँड मस्ती (2013) हे दोन चित्रपट हिट झाले होते. ग्रँड मस्तीचं यश इतकं मोठं होतं की, ती भारतातील पहिली एडल्ट कॉमेडी फिल्म बनली, ज्याने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमवला. भारतात अॅडल्ट कॉमेडी चित्रपट पाहणारे इतके लोकं आहेत का असा प्रश्न सर्वांना पडला.

देश आणि समाज कोणत्या दिशेने चालला आहे? विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी, रितेश देशमुख आणि उर्वशी रौतेलाचा ग्रँड मस्ती तिकीट खिडकीवर आशेने पाहत होता. असं चित्रपट देशाचे आणि समाजाचं वातावरण बिघडवतात, ते का बनवले जातात, असे वादही झाले.