रेल्वे स्थानकावर गाणाऱ्या रानूचं सलमान कनेक्शन वाचून व्हाल थक्क

 पुन्हा एकदा चर्चा 'सलमान फॅक्टर'ची

Updated: Aug 25, 2019, 08:24 AM IST
रेल्वे स्थानकावर गाणाऱ्या रानूचं सलमान कनेक्शन वाचून व्हाल थक्क

मुंबई : कोलकात्यातील रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. सुरेल आवाजाची दैवी देणगी मिळणाऱ्या रानू आजडच्या घडीला कोणा एका सेलिब्रिटीहून कमी नाहीत. सोशल मीडियाच्या बळावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून रानू यांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचला, ज्यानंतर त्यांच्या आवाजाची दखल बॉलिवूडमधील संगीतकार हिमेश रेशमिया यानेही घेतली. 

रानू यांनी गायलेल्या 'तेरी मेरी कहानी' या गाण्यंच्या रेक़ॉर्डिंगचा व्हिडिओही हिमेशने पोस्ट केला. एका खऱ्या कलाकाराला संधी दिल्याबद्दल नेटकऱ्यांनी आणि अनेकांनीच हिमेशची प्रशंसा केली. या कृतीसाठी त्याची पाठ थोपटली. या साऱ्यामध्ये आता आणखी एका व्यक्तीला श्रेय देण्यात येत आहे. 

कलाविश्वात सर्वांच्याच मदतीसाठी ओळखला जाणारा हा सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता सलमान खान. रानू आणि सलमानचं नातं नेमकं आहे तरी कसं हे वाचून तुम्हीही थक्क व्हाल. हिमेश रेशमिया स्वत: कायमच सलमान खानला अनेक गोष्टींसाठी श्रेय देतो. यावेळीसुद्धा त्याने याचीच पुनरावृत्ती केल्याचं पाहिलं. पण, इथे खरं श्रेय ठरलं ते म्हणजे सलमान खानचे वडील सलीम खान यांचं. त्यांच्या एका वक्तव्याच्या आणि शिकवणुकीच्या बळावरच हिमेशने रानू यांना ही संधी दिली. 

'सलमान भाईचे वडील सलीम खान, यांचा एक सल्ला मला मदत करुन गेला. सलीम काकांनी एकदा मला सांगितलं होतं, की जीवनात केव्हाही, कधीही कलागुणसंपन्न व्यक्तीशी तुझी गाठ पडली तर त्या व्यक्तीला तुझ्या संपर्कातून जाऊ देऊ नको', असा सल्ला आपल्याला मिळाल्याचं हिमेशने सांगितलं. याच सल्ल्यानुसार व्हायरल व्हिडिओ पाहताच रानू यांच्याकडून गाणं गाऊन घ्यायचा निर्णय हिमेशने घेतला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भाईजान 'सलमान फॅक्टर' एका कलाकाराच्या प्रसिद्धिसाठी निमित्त ठरला आहे.