दुसऱ्या लग्नाला दहा दिवसही उलटले नाहीत तोच, बॉलिवूड सेलिब्रिटी पुन्हा विवाहबंधनात

एक अशी जबाबदारी जी आपल्याला घडवून जाते. खुप काही शिकवून जाते

Updated: May 30, 2022, 09:41 AM IST
दुसऱ्या लग्नाला दहा दिवसही उलटले नाहीत तोच, बॉलिवूड सेलिब्रिटी पुन्हा विवाहबंधनात title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लग्न... आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत, आपल्या खास मित्रासोबत साता जन्माच्या शपथा घेत वचनबद्ध होण्याचा क्षण अनेकांनाच सुखावून जातो. मुळात विवाहसंस्था ही एक प्रथा नसून ती एक जबाबदारी आहे. एक अशी जबाबदारी जी आपल्याला घडवून जाते. खुप काही शिकवून जाते. 

काही दिवासांपूर्वी एका बॉलिवूड सेलिब्रिटीनं दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आणि सर्वांमध्येच पुन्हा एका लग्नाच्या चर्चांना वाव मिळाला. 

या सेलिब्रिटीनं सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत परिकथाही सत्यरुप घेतात, असं कॅप्शनमधून म्हटलं. पतीसोबचे काही खास क्षण तिनं सर्वांच्या भेटीला आणले आणि सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून सर्वजण भारावले. 

हीच सेलिब्रिटी तिच्या या दुसऱ्या लग्नाला दहा दिवसही उलटले नाहीत, तोच पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली आहे. 

दुसऱ्या लग्नापुरता न थांबता तिसऱ्यांदा लग्न करणारी ही सेलिब्रिटी आहे, गायिका कनिका कपूर. तिनं पुन्हा एकदा सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. (Bollywood Singer Kanika Kapoor Court Wedding With Gautam Hathiramani photos )

यावेळी कनिकानं मांडवी लग्नानंतर पार पडलेल्या तिच्या कायदेशीर लग्नाचे काही क्षण सर्वांच्या भेटीला आणले आहेत. 

कायदेशीररित्या एकमेकांचा पती- पत्नी म्हणून स्वीकार करतानाचे क्षण कनिकानं सर्वांच्या भेटीला आणले. तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये पती, गौतम हाथीरमाणीसुद्धा प्रचंड आनंदात दिसत आहे. 

काही क्षणांना फार अंकारिक शब्दांची गरज नसते, कनिका आणि गौतमच्या आयुष्यातील हा क्षण त्यापैकीच एक असं म्हणायला हरकत नाही. कारण, कनिकानं हे फोटो शेअर करत Happiness इतकंच कॅप्शन दिलं आहे. 

फोटोंमध्ये कनिका पांढऱ्या रंगाच्या सूट वेडिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. तर, गौतमनं बेज रंगाच्या सूटला पसंती दिली आहे. अतिशय सुरेख अशी ही जोडी एकमेकांना शोभून दिसत आहे.