सलग तिसऱ्या दिवशी 'हाऊसफुल ४' चित्रपटाची दमदार कमाई

यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रेमींसाठी एकापेक्षा एक चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाले आहेत. 

Updated: Oct 28, 2019, 05:58 PM IST
सलग तिसऱ्या दिवशी 'हाऊसफुल ४' चित्रपटाची दमदार कमाई

मुंबई : यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रेमींसाठी एकापेक्षा एक चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाले आहेत. २५ ऑक्टोबर रोजी 'हाऊसफुल ४' चित्रपट रूपेरी पडद्यावर झाला. त्याचप्रमाणे आता 'सांड की आंख', 'मेड इन चायना' 'हाऊसफुल ४' या तीन चित्रपटांमध्ये कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. तब्बल १० वर्षांनंतर तीन चित्रपट एकत्र चित्रपटगृहात धडकले आहेत. 

परंतु बॉक्स ऑफीसवर 'हाऊसफुल ४' चित्रपटाने बाजी मारली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल ४' चित्रपटाने जवळपास २० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. दुसऱ्या दिवशी १८ कोटी रूपये तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने १४.२५ कोटींचा गल्ला जमा केला आहे. 

अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर स्टारर 'सांड की आंख' चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवर योग्य नेम लागला नाही. चित्रपटाने आतापर्यंत फक्त २.५० कोटींचा गल्ला जमा केला आहे. 

त्याचबरोबर 'मेड इन चायना' चित्रपटाने तीन दिवसांत फक्त ३.३७ कोटी रूपयांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे चित्रपटाचं ट्रेलर चाहत्यांच्या चांगलचं पसंतीस पडला होता. परंतु रूपेरी पडद्यावर चाहत्यांचे मनोरंजन करण्यास 'सांड की आंख', 'मेड इन चायना' फेल झाला आहे.