बॉक्स ऑफिस वर कुणाचा दरारा | 'कबीर सिंह'चा की 'जजमेंटल है क्या'चा

प्रत्येक शुक्रवारी अनेक नवीन थाटणीचे चित्रपट मोठ्या पडद्यावर धडकतात. 

Updated: Aug 1, 2019, 05:45 PM IST
बॉक्स ऑफिस वर कुणाचा दरारा | 'कबीर सिंह'चा की 'जजमेंटल है क्या'चा title=

मुंबई : चित्रपट साकारण्यासाठी अनेक कलाकार आपलं घाम गाळतात. प्रत्येक शुक्रवारी अनेक नवीन थाटणीचे चित्रपट मोठ्या पडद्यावर धडकतात. काही चित्रपट यशच्या उच्च शिखरावर पोहोचतात तर काहींना मात्र अपयश स्विकारावं लागतं. गेल्या काही अठवड्यापासून 'कबीर सिंग' चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. त्यानंतर 'सिम्बा- द लायन किंग', 'सुपर ३०', 'जजमेंटल हैं क्या' हे चित्रपट सुद्धा कमाईमध्ये चढत्या क्रमंकावर आहे. 

प्रदर्शनला अनेक दिवस लोटले असले तरी 'कबीर सिंग' चित्रपटाची लोकप्रियता कमी होण्याचं नाव घेत नसल्याचे दिसत आहे. त्या मानाने कंगनाच्या 'जजमेंटल हैं क्या' चित्रपटाचा वेग मंदावता दिसत आहे. 

'कबीर सिंग'
प्रेमात उध्वस्त झालेल्या कबीरच्या प्रेम कथने चाहत्यांना चांगलेच आकर्षीत केले आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे सतत चढत्या क्रमावर आहेत. 'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरला आहे. १३ जुलै रोजी चित्रपटाने जवळपास २७४ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. 

'सुपर ३०'
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन स्टारर 'सुपर ३०' चित्रपटाच्या कमाईचा आकडा सलग चढत्या क्रमावर आहे. चित्रपटाने १७ दिवसांमध्ये १२५ कोटी रूपयांचा आकडा पार केला. चित्रपटाने आतापर्यंत १३० कोटींचा  हा चित्रपट १५० कोटींच्या घरात प्रवेश करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्षणाच्या भोवती फिरत असलेल्या चित्रपटाच्या कथेला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. अभिनेता हृतिक रोशनच्या भूमिकेला चित्रपट समिक्षकांसह, प्रेक्षकांकडूनही चांगली दाद मिळत आहे.