'हम आपके हैं कोन'चा कधीही न पाहिलेला Video Viral, पाहून तुम्हाला येईल लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण

Hum Apke Hai Kon BTS Video: 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट आपण सर्वांनीच अनेकदा पाहिला असेलच. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचा (Hum Apke Hai Kon Video) अभिनय हा आपल्या मनात अजूनही आहे.  सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात या चित्रपटातील पडद्यामागील गंमतीजमती (Trending) आपण पाहू शकतो. 

Updated: Mar 16, 2023, 06:50 PM IST
'हम आपके हैं कोन'चा कधीही न पाहिलेला Video Viral, पाहून तुम्हाला येईल लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण title=
BTS Video of popular movie hum apke hai kon goes viral madhuri dixit laxmikant berde in the video

Hum Apke Hai Kon BTS Video: 'हम आपके हैं कौन' (Hum Apke Hai kon) हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी सलमान खान, माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), रेणूका शहाणे, लक्ष्मीकांत बेर्डे, रिमा लागू आणि अन्य दिग्गज कलाकारांच्या अभिनयानं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) तूफान गाजला होता. या चित्रपटाची स्टोरी, लेखन-दिग्दर्शनही प्रेक्षकांना अगदी आपल्या घरातीलच वाटले होते.इतकी वर्षे झाली तरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील गाणी आणि त्यात रंगवलेला लग्नसोहळा, प्रेक्षकांना अन् अनेक कुटुंबियांना आपल्या घरातलाच वाटला होता.

या चित्रपटाच्या अनेक क्लिप्सही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या पुन्हा या चित्रपटातील एक बीटीएस (Hum Apke Hai Kon Behind the Scenes Video) दृश्य सगळीकडेच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे. 

आपल्या परिवारात कुठे लग्न सभारंभ असला तर आपण औपचारिकता म्हणून लग्नाला जातो, जेवून घरी परत येतो परंतु आपल्या घरी आपल्या जवळच्या मित्राचे अथवा परिवारातील अगदी जवळच्या नातेवाईकाचे लग्न असेल तर आपण धुमधडक्यानं लग्नात सहभागी झाल्याशिवाय राहत नाही. टिपिकल कुटुंबांमध्ये जी धम्माल मज्जामस्ती असते तशीच मज्जामस्ती आणि रूसवे-फुगवे या चित्रपटातूनही दाखवण्यात आले होते. त्यातून सलमान खान आणि माधूरी दीक्षितची लव्ह स्टोरीही यावेळी प्रेक्षकांना प्रचंड (Salman Khan and Madhuri Dixit) भावली होती. 

या चित्रपटात अनेक मराठी लोकप्रिय अन् दिग्गज कलाकार होते त्यातील महत्त्वाचे नावं म्हणजे ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). आपल्या वेगळ्याच्या भुमिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. नाही हा व्हिडीओ पाहून त्यांचा प्रत्येक चाहता हा भावूक झाल्याशिवायाही राहणार नाही. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे एका गार्डनमध्ये जिन्यापाशी बसले आहे आणि चित्रपटातील टफी (Tuffy) या कुत्र्याशी खेळताना दिसत आहेत. त्यानंतर चित्रपटाचे डिरेक्टर आणि क्रुचीही झलक व्हिडीओतून दिसते. शेवटी माधुरी आरश्यात पाहून टचअप करताना दिसते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

@madhuridnmylove नावाच्या इन्टाग्राम (Instagram) युझरनं हा व्हिडीओ इन्टाग्रामवर मागील वर्षी अपलोड केला होता. सध्या हा व्हिडीओ चाहत्यांकडून पाहिला जातो आहे. या व्हिडीओ (Video) आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांनी हा व्हिडीओ लाईकही केला आहे. तुम्ही हा व्हिडीओ चुकवला असेल तर आत्ताच हा व्हिडीओ पाहा. अजिबातच वेळ वाया घालवू नका.