रिलेशनशिपच्या अफवांमुळे सेलिब्रिटी जोडीच्या कुटुंबीयांना मनस्ताप

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी श्रीवास्तव सध्या तिच्या ब्रेकअपमुळे चांगलीच चर्चेत आहे. 

Updated: Jul 30, 2019, 03:57 PM IST
रिलेशनशिपच्या अफवांमुळे सेलिब्रिटी जोडीच्या कुटुंबीयांना मनस्ताप

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी श्रीवास्तव सध्या तिच्या ब्रेकअपमुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेता मोहीत अबरोल आणि ती गेल्या अनेक वर्षांपसून एकमेकांना डेट करत होते. २०१६ मध्ये त्यांनी साखरपुडा देखील केला होता. मात्र आता ते विभक्त झाले आहे. सोमवारी मोहीतचे इस्टाग्राम अकाउंट हॅक करून एक पोस्ट व्हायरल करण्यात आली होती त्यामध्ये मानसीची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणासंबंधी पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे देखील त्याने सांगितले.

'व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टमध्ये काहीही तथ्य नाही, अशा खोट्या पोस्ट शेअर करून कोणीतरी मानसीची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे त्याच्या बद्दल मी फार संताप व्यक्त करत आहे. त्यामुळे मी पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली आहे. या खोट्या बातमीचा परिणाम आमच्या कुटुंबावर होत आहे' असे पोस्ट करत मोहीतने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

मोहीत आणि मानसीच्या ब्रेकअपनंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे व्हायरल पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते. शिवाय त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या असून, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही म्हटलं जात होतं. परंतू, हे सारंकाही खोटं असल्याचं आता स्पष्ट झाले आहे. आता मोहीतने ती पोस्ट त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून डिलीट केली आहे.