OMG 2 मधील अक्षय कुमारची भूमिका बदला, सेन्सॉर बोर्डाचा आदेश!

OMG 2 : अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. अशात सेंसॉर बोर्डानं चित्रपटांमध्ये अनेक बदल करायला सांगितले आहेत. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे जाणार की तिच असेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 30, 2023, 05:16 PM IST
OMG 2 मधील अक्षय कुमारची भूमिका बदला, सेन्सॉर बोर्डाचा आदेश! title=
(Photo Credit : Social Media)

OMG 2 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शनाची तारिख जवळ येत असताना दुसरीकडे सेंसर बोर्डानं त्यातील 20 सीन्सवर कात्री चालवली आहे. सेंसर बोर्डानं चित्रपटाला A सर्टिफिकेट देखील दिलं आहे. हा चित्रपट CBFC च्या मेंबर्सच्या पसंतीस उतरल्याचे म्हटले जात आहे. त्यात या चित्रपटाविषयी त्यांची चिंता देखील व्यक्त केली आहे. त्याचं कारण म्हणजे चित्रपटातील मास्टरबेशन आणि सेक्स एड्युकेशनसोबत भगवान शिव यांच्या कनेक्शनवर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असेल. त्यात आता आणखी एक माहिती समोर आली आहे की चित्रपटात लोक अक्षय कुमारची भूमिका बदलण्यास सांगितली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय कुमार या चित्रपटात भगवान शिवच्या भूमिकेत दिसत आहे. 

कोईमोईनं दिलेल्या माहितीनुसार, सेंसर बोर्डानं चित्रपटात अक्षय कुमारची भूमिका बदलण्यास सांगितले आहे. तर चित्रपटात अक्षय हा भगवान शिव यांच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे चित्रपटात त्याला भगवान शिव यांच्या भूमिकेत दाखवू शकत नाही. कारण यामुळे प्रेक्षकांच्या धार्मिक भावना दुखावतील. त्यामुळे त्याची भूमिका बदलून शिवचा दूत करण्यास सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून रिपोर्ट्समध्ये सतत सांगण्यात येत आहे की सेंसर बोर्डानं 20 कट्स सांगत 'ओएमजी 2' ला A सर्टिफिकेट देण्यात तयार आहे. अशात चित्रपटाच्या निर्मात्यांनी असा निर्णय घेतला आहे की त्यातील काही कट्स काढून टाकण्यासाठी त्यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करतील. पण त्यांच्याविरोधात कोर्टात जाणार नाही. त्याचं कारण म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनाला खूप कमी वेळ उरला आहे. ते CBFC नं दिलेले सल्ले ऐकून 11 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित करतील. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर सुत्रांच्या हवाले दिलेल्या माहितीत सांगितले आहे की चित्रपटात हे बदल करण्यासाठी 'OMG 2' चे निर्मात्यांना अक्षयचे काही सीन्स आणि डायलॉग्स बदलावे लागतील. तर काही सीन्स कट करावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या सीन्समध्ये अक्षयचा रंग हा भगवान शिव यांच्याप्रमाणे निळा दाखवण्यात आला आहे तर या सीन्सवर सगळ्यात जास्त वेळ आणि त्याचा रंग डिजिटली बदलवण्यात खूप वेळ आणि पैसे देखील वाया जातील. 

हेही वाचा : 'या' बालकलाकाराला तुम्ही ओळखलत का? आज एका चित्रपटासाठी घेतो 100 कोटींचे मानधन

दरम्यान, हे सगलं पाहता हा चित्रपट आता 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार की नाही असा प्रश्न अनेक चाहत्यांसमोर उपस्थित झाला आहे. तर याच दिवशी सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट देखील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जर 'OMG 2' हा चित्रपट आता प्रदर्शित न होता त्याला पुढे ढकलण्यात आले तर या पुढे देखील अनेक चित्रपट आहेत त्यामुळे त्याचा याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर किती परिणाम होईल यावर प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.