मुंबई : बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री त्यांच्या हटके फॅशन स्टाईलिंगमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या ड्रेसपासून ते फुटवेअर पर्यंत प्रत्येक गोष्टी चाहत्याचं लक्षवेधून घेतात. त्यात सध्या बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोण तिच्या एका ओव्हर साईझ स्वेटरमुळे चर्चेत आली आहे.मोठमोठ्या इव्हेंटला रेड कार्पेटवर दीपिकाचा जलवा पाहायला मिळतोच, पण एअरपोर्ट लूकपासून ते स्ट्रीट लूकमध्ये ही दीपिका इतर अभिनेत्रींना चांगलीच टक्कर देते.
नुकतीच दीपिका नव्या प्रोजेक्टच्या मिटींगसाठी संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये पोहोचली होती. यावेळी दीपिकाने रेड कलरचं ओव्हर साईझ स्वेटर घातलं होतं, त्यावर ब्लू जीन्स आणि हाय हील्स घातल्या होता.दीपिकाच्या या स्वेटरची किंमत किती आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर हे स्वेटर Balanciaga या ब्रॅण्डचं आहे. याची किंमत 57 हजार इतकी आहे.
अभिनेता हृतिक रोशन दीपिकासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. दीपिका पाठोपाठ अभिनेता कार्तिक आर्यन देखील पोहोचला होता. हृतिक आणि दीपिका लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. 'फाइटर' या सिनेमात ही जोडी एकत्र दिसणार आहे. यासाठीच हे स्टार एकत्र जमले होते.
दीपिकाचा हा मिस मॅच लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे.हृतिक आणि दीपिकाच्या 'फाइटर' या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. याआधी सिद्धार्तने हृतिकच्या 'वॉर' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.