ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव आल्याने दीपिका पादुकोन सोशल मीडियावर ट्रोल

 बॉलिवूडचे अनेक कलाकार एनसीबीच्या रडारवर

Updated: Sep 22, 2020, 04:08 PM IST
ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव आल्याने दीपिका पादुकोन सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर आता बॉलिवूडचे अनेक कलाकार एनसीबीच्या रडारवर आले आहेत. श्रद्धा कपूर, सारा अली खान, आणि रकुल प्रीत सिंह यांचं नाव पुढे आल्यानंतर चाहत्यांना ही धक्का बसला आहे. त्यात आता अभिनेत्री दीपिका पादुकोणचं नाव आल्याने लोकं हैराण झाले आहेत. लोकं आता उघडपणे आपला संताप व्यक्त करत आहेत. रिपोर्ट्सनुसार सुशांतची मॅनेजर जया शहाची मॅनेजर करिश्मा आणि दीपिकाचं चॅट समोर आलं आहे. या चॅटमध्ये करिश्मा अभिनेत्री दीपिका पादुकोणला विचारत आहे की माल आहे का?

दीपिका सोशल मीडियावर ट्रोल

दीपिकाचं नाव पुढे आल्यानंतर सोशल मीडियावर दीपिका ट्रोल होत आहे. तिच्या इंस्टाग्राम फोटोंवर लोक विविध प्रकारे कमेंट करत आहेत. दरम्यान, तिचा इन्स्टाग्रामचा एक जुना फोटोही व्हायरल झाला आहे, जो दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 19 नोव्हेंबर 2019 रोजी शेअर केला होता. या फोटोमध्ये ती पती रणवीर सिंगला 'सुपर ड्रग' म्हणत आहे. या फोटोमध्ये रणवीर आहे, पण त्याचा चेहरा दिसत नाही. दीपिकाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'आणि तू ... माय सुपर ड्रग'. एनसीबीच्या चौकशीत दीपिकाचे नाव समोर आल्यानंतर हा फोटो आता व्हायरल होत आहे.

कंगनाने दीपिकाला केलं लक्ष्य

सुशांत प्रकरण आणि ड्रग प्रकरणात कंगनाने यापूर्वीच बॉलिवूडला लक्ष्य केले आहे. ड्रग्स तपासात दीपिकाचे नाव आल्याने कंगनाने आता तिच्यावर ही टीका केली आहे.