नवी दिल्ली : अलीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंगच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. सुरूवातीला ते साखरपूडा करणार असल्याचे म्हटले जात होते तर आता त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगच्या चर्चा रंगायला लागल्या आहेत.
त्यातच दीपिकाने बोलेअर अवार्ड्स-2018 ला उपस्थिती लावली. या पुरस्कार सोहळ्यात तिला इटली टूरिझमकडून सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने सांगितले की, पद्मावत चित्रपटात मला मिळालेले रणवीर आणि शाहीदचे योगदाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जे माझ्या कायम लक्षात राहील. चित्रपटाचे यशाचा आनंद आम्हांला साजरा करता येतोय, म्हणून मी अत्यंत आनंदीत आहे.
पद्मावतचे यश कसे साजरे केले असे विचारताच तिने सांगितले की, प्रामाणिकपणे सांगायचे तर आनंद साजरा करण्याची कोणतीही वेळ नसते. कारण सध्या खूप काही होत आहे. म्हणून ही सेलिब्रेशनचीच वेळ आहे. तिला व्हेलंटाईन डे बद्दल छेडले असता दीपिका म्हणते, प्रेम प्रत्येक दिवशी साजरे केले पाहिजे. मी सध्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्यादिवशीही मी कामच करेन.
दीपिका विशाल भारद्वाजच्या आगामी चित्रपटात अभिनेता इरफान खानसोबत काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव अजूनही ठरवण्यात आलेले नाही.
बॉलिवूडलाईफ.कॉमच्या वृत्तानुसार, रणवीर आणि दीपिका समुद्र किनारी लग्न करण्याचा प्लॅन करत आहेत. दोघांनाही बीच आवडत असल्याने हे डेस्टिनेशन वेडींग समुद्र किनारी होईल. लग्नाला फक्त दीपिका-रणवीच्या घरातील मंडळी आणि मित्रपरिवार उपस्थित असेल.