देवमाणूस-2 मालिकेत आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्वीस्ट

दुसऱ्यांना अडकवणारा 'डॉक्टर' आता स्वतः अडकणार? देवमाणूस-2 मालिकेत  मोठा ट्वीस्ट

Updated: Feb 11, 2022, 09:57 PM IST
देवमाणूस-2 मालिकेत आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्वीस्ट title=

मुंबई : देवमाणूस या मालिकेतील देविसिंग पुन्हा आपलं रुप बदलून देवमाणूस 2 या मालिकेत आला आहे. पहिल्या भागातील त्याचा उद्देश दुसऱ्याही भागात सारखाच आहे. पैशांसाठी लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना संपवणाऱ्या या डॉक्टरची ही मालिका आता एक वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत आता खूप रंजक ट्वीस्ट येणार आहे. 

या मालिकेतील गावासाठी देवमाणूस असलेला डॉक्टर कॉन्ट्रॅक्टरच्या पत्नीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतो. त्याला त्या महिलेकडून पैसे हवे असतात. त्यासाठी तो महिलेसोबत प्रेमाचं खोटं नाटक करतो. देवीसिंगला म्हणजेच डॉक्टरला वाटतं की त्याच्या जाळ्यात कॉन्ट्रॅक्टरची बायको फसेल आणि पैसा मिळेल. मात्र आता या सगळ्या प्रकरणात एक मोठा ट्वीस्ट आला आहे. 

झी मराठीनं एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये डिंपल देविसिंगचा पाठलाग करत कॉन्ट्रॅक्टरच्या बायकोच्या घरी पोहोचते. देवीसिंग महिलेसोबत बेडरूममध्ये असतो. त्याला वाटत असतं त्याचा प्लॅन यशस्वी होत आहे. मात्र शेवटच्या क्षणी प्लॅन सगळा फसतो. कॉन्ट्रॅक्टरची पत्नी मरते मात्र देवीसिंग त्याचा मारेकरी नसतो. 

कॉन्ट्रॅक्टरच्या पत्नीला कोणी मारलं असेल? देवीसिंग या प्रकरणात अडकणार का? देवीसिंगचा प्लॅन आता कसा यशस्वी होणार की तो गुन्ह्यामध्ये अडकणार आणि त्याचा खेळ संपणार असे अनेक प्रश्न आणि उत्सुकता चाहत्यांच्या मनात या प्रोमोमुळे निर्माण झाली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x