मुंबई: ‘धडक’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या जान्हवी कपूर हिने सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत अनेकांचच लक्ष वेधलं आहे. मुख्य म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तिने अभिनेता सलमान खानच्या बहिणीचा म्हणजेच अर्पिता खानचा पती आयुष शर्मा याला आव्हान दिलं आहे. त्यामुळे जान्हवीवरही ‘सुई-धागा’ फिव्हर असल्याचं कळत आहे. तेव्हा जान्हवीचं हे आव्हान आहे तरी काय, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?
गेल्या काही दिवसांपासून या आव्हानाची, सोप्या शब्दांत म्हणावं तर या चॅलेंजची कलाविश्वात चर्चा पाहायला मिळत आहे. या चॅलेंजचं नाव आहे, ‘सुई-धागा’ चॅलेंज.
जान्हवीने आधी स्वत: हे चॅलेंज पूर्ण केल असून, त्यानंतरच आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र असणाऱ्या आयुष शर्मा, वारिना हुसैन आणि ‘धडक’मधील तिचा सहकलाकार इशान खट्टर यालाही चॅलेंज दिलं आहे.
जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडिओध्ये तिची बहीण खुशीसुद्धा ‘सुई-धागा चॅलेंज’ स्वीकारताना दिसत आहे. पण, खुशीला काही हे चॅलेंज जमलेलं नाही, हेसुद्धा तितच खरं.
एकीकडे सुईमध्ये धागा ओवण्यासाठी खुशीची धडपड सुरु असताना जान्हवीने मात्र अवघ्या काही सेकंदांमध्येच हे काम करत स्वत:चीच पाठ थोपटली आहे.
अनुष्का शर्मा आणि वरूण धवन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘सुई-धागा’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच तिने हे चॅलेंज स्वीकारलं आणि पूर्णही केलं. आता तिने दिलेलं आव्हान आयुष, वरिना आणि इशान स्वीकारणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.