ती फोटोतही नको? सलमाननं ऐश्वर्याला क्रॉप करत केला फोटो शेअर

जो तीन वर्षांपुर्वी खुद्द सलमानेच ट्विट करत शेअर केला होता.जो तीन वर्षांपुर्वी खुद्द सलमानेच ट्विट करत शेअर केला होता

Updated: Sep 8, 2022, 05:09 PM IST
ती फोटोतही नको? सलमाननं ऐश्वर्याला क्रॉप करत केला फोटो शेअर title=

Salman Khan OId Photo Viral: सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) यांचे अफेअर हे जगजाहीर होते. तेव्हा हे प्रकरण प्रचंड प्रमाणात गाजले होते. हम दिल दे चुके सनम (Hum Dil De Chuke Sanam) हा चित्रपट सलमान आणि ऐश्वर्याचा हीट चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या दरम्यानच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या चित्रपटाच्या दरम्यान एक जुना फोटो पुन्हा व्हायरल होतो आहे. जो तीन वर्षांपुर्वी खुद्द सलमानेच ट्विट करत शेअर केला होता. (director sanjay leela bhansalis neice sharmin segaln is seen with salmans picture which was tweeted by him)

या फोटोमध्ये एक मुलगी सलमानसोबत तिचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. त्याचबरोबर या फोटोत ऐश्वर्या राय देखील सलमानसोबत दिसत आहे. या फोटोत सलमानने ऐश्वर्याला क्रॉप केलेले दिसते आहे. परंतु तुम्हाला फोटोमध्ये तिचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मुलीला ओळखता येईल का?

फोटोत सलमानसोबत दिसणारी ही मुलगी आजची बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात 2019 मध्ये आलेल्या 'मलाल' (Malal) चित्रपटातून केली होती. सलमानसोबत दिसणारी मुलगी शर्मीन सहगल (Sharmeen Sehgal) आहे. शर्मीन ही सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची भाची आहे. या फोटोमध्ये सलमान लहान शर्मीन सेगलसोबत दिसत आहे. या छायाचित्रात ती तिचे मामा संजय लीला भन्साळी यांना केक खाऊ घालताना दिसत आहे. हा एक थ्रोबॅक व्हिडीओ आहे जो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. 

या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केले आहे ज्यात त्यांनीही ऐश्वर्याला क्रॉप केल्याचे निरिक्षण नोंदवले आहे.