दिशा पाटणीकडून अंघोळ करतानाचा फोटो शेअर; पाहून चाहते हैराण

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटणी तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या स्लिम बॉडीसाठी ओळखली जाते

Updated: Mar 28, 2022, 09:03 PM IST
दिशा पाटणीकडून अंघोळ करतानाचा फोटो शेअर; पाहून चाहते हैराण title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटणी तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या स्लिम बॉडीसाठी ओळखली जाते.  दिशाच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटो आणि व्हिडीओची कायम चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा दिशा पाटणीने तिच्या लेटेस्ट सिझलिंग फोटोने सर्वांना खुश केलं आहे.

अभिनेत्रीने तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिशा पाण्यात उभी राहून अंघोळ करत असल्याचं  दिसत आहे. या फोटोमध्ये दिशाचे केस आणि चेहरा ओला झालेला दिसतो. सगळ्या सेलिब्रिटींसोबतच चाहतेही दिशाच्या या फोटोचं कौतुक करत आहेत.

व्हायरल होतोय फोटो
अवघ्या दोन तासांत दिशाच्या या फोटोला साडेपाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून हा आकडा झपाट्याने वाढत आहे. दिशाची अशी स्टाइल पाहून तिचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफच्या हार्टबिट्स वाढतील, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहत्यांसोबतच सगळे यूजर्स कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दिशाच्या वर्कफ्रंटवर बोलायचं झालं तर, ती लवकरच अभिनेता जॉन अब्राहम, अर्जुन कपूर यांच्यासोबत मोहित सूरीच्या एक व्हिलन रिटर्न्स सिनेमात दिसणार आहे.