Tiger Shroffसोबत मालदीवला रवाना झाली 'गर्लफ्रेंड' Disha Patani, फोटो होतायेत व्हायरल

टाइगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे स्टार कपल सुट्टीसाठी मालदीवला रवाना झाला आहे

Updated: Apr 18, 2021, 09:18 PM IST
Tiger Shroffसोबत मालदीवला रवाना झाली 'गर्लफ्रेंड' Disha Patani, फोटो होतायेत व्हायरल title=

मुंबई : बॉलीवूड ॲक्शन हिरो टाइगर श्रॉफ आणि एक्ट्रेस दिशा पटानी भले ही आपल्या रिलेशनशिप बद्दल कोणताही खुलासा करत नाहीत परंतु हे दोघेही कायमच एकत्र  स्पॉट होतात. त्या दोघांची केमिस्ट्री सोशल मीडियावर देखील स्पष्टपणे दिसत असते. आता हे स्टार कपल सुट्टीसाठी मालदीवला रवाना झाला आहे. आणि या दोघांचा वेकेशनचे प्लानचं राज तेव्हा समोर आलं जेव्हा हे दोघे एकाच फ्लाईटने मालदिवसाठी रवाना झाले                                          

फोटो तर सोशल मीडियावर व्हायरल                                        
सध्या कोरोनामुळे सगळीकडेच संचारबंदीचं चित्र पाहायला मिळतंय अशातच चित्रपटांचं शूटिंग सुद्धा थांबलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरण खूप वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे दोघेही आपला वेळ यादगार बनवण्यासाठी मालदीवला रवाना झाले आहेत. फोटोग्राफर विरल भयानीने इंस्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लूक बद्दल बोलायचं झालं तर दिशा पटानी ट्यूब स्टाइल पिंक ब्रालेट बरोबर सोबत ब्लू श्रग आणि रिप्ड जीन्समध्ये खूप सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे टायगर श्रॉफ ब्लू कलरच्या आउटफिट मध्ये दिसून आला दोघांनी कोरोनापासून रक्षण करण्यासाठी मास्क देखील लावले आहेत                               

रिलेशनशिप बद्दल सतत विचारणा केल्यानंतर टायगरने गेल्या वर्षी दिशाशी प्रेम संबंध नसल्याचं जाहीर केलं होतं. परंतु, त्याचे चाहते हे मान्य करण्यास तयार नाहीत जेव्हा-जेव्हा हे दोघे एकत्र पाहिले गेलेत तेव्हा-तेव्हा यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.