अन् दिव्यांका त्रिपाठीचे डोळे पाणावले...

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हे टी.व्ही. जगतातील एक नावाजलेले नाव. 

Updated: May 5, 2018, 12:37 PM IST
अन् दिव्यांका त्रिपाठीचे डोळे पाणावले... title=

मुंबई : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हे टी.व्ही. जगतातील एक नावाजलेले नाव. मालिका ये है मोहब्बतें मधून ईशिता भल्लाच्या रुपात घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लवकरच झी टी.व्ही.च्या नव्या टॉक शो 'जज बात' मध्ये दिसणार आहे. हा शो राजीव खंडेलवाल होस्ट करत आहे. या शो मध्ये दिव्यांका एकटीच नाही तर पती विवेक दहियासोबत दिसणार आहे. विवेक दहियासोबत लग्न करण्यापूर्वी दिव्यांका तिच्या पहिल्या मालिकेचा म्हणजेच बनू में तेरी दुल्हनचा कोस्टार शरद मल्होत्रासोबत खूप काळ रिलेशनशीपमध्ये होती. या टॉक शो मधून जूनी नाती, ब्रेकअप यांचा उलघडा होताना दिसणार आहे.

अन् तिचे डोळे पाणावले...

अलिकडेच या शो चा एक प्रोमो समोर आला. यात दिव्यांका ब्रेकअपवर बोलताना अत्यंत भावूक झालेली दिसली. त्याबद्दल बोलताना तिचे डोळेही पाणावले. दिव्यांका आणि शरदचे नाते जवळपास ८ वर्ष होते. या प्रोमोत दिव्यांका म्हणते की, ८ वर्ष, तेव्हा असे वाटले होते की आयुष्यच संपले आहे. मी अंधविश्वासच्या स्तरावर गेले. दिव्यांकाने या शो चा प्रोमो शेअर केला आहे.

तुम्हीही पहा...

 

Waiting  6th May... SUNDAY... 7pm.... On Zee... #JuzzBaatt #DiVek

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya) on

अशी जमली 'दिवेक' जोडी

दिव्यांका आणि शरद यांची भेट बनू मैं तेरी दुल्हनच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. त्यानंतर ओळख, मैत्री, प्रेम असा प्रवास घडला. सुमारे ८ वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर २०१५ मध्ये ही जोडी विभक्त जाली. त्यानंतर दिव्यांकाची भेट अभिनेता विवेक दहियासोबत ये हैं मोहब्बतें च्या सेटवर झाली आणि दोघांची जवळीक वाढली. या जोडीला दिवेक या नावाने ओळखले जाते. इतकंच नाही तर दिव्यांका आणि विवेक डान्स रियालिटी शो नच बलिये चे विजेते ठरले होते.