'बसपन का प्यार' या व्हायरल गाण्याचा 'हा' आहे ओरिजनल सिंगर

आजकाल इंटरनेटवर एक मूलगा व्हायरल होत आहे. 

Updated: Aug 1, 2021, 03:52 PM IST
'बसपन का प्यार' या व्हायरल गाण्याचा 'हा' आहे ओरिजनल सिंगर

मुंबई : आजकाल इंटरनेटवर एक मूलगा व्हायरल होत आहे. सहजपणे 'बसपन का प्यार' गाणाऱ्या या मुलाचं नाव सहदेव दिर्डो आहे. छत्तीसगडच्या सहदेवने संपूर्ण देशाला त्याच्या गाण्य़ाने वेड लावलं आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेलपासून सुपरस्टार अनुष्का शर्मापर्यंत सगळेच सहदेवच्या गाण्याच्या प्रेमात पडले आहेत. हे गाणं सहदेवने 2019 मध्ये त्यांच्या शाळेत गायलं होतं. सहदेवच्या शाळेतील शिक्षकाने ते मोबाइलवर रेकॉर्ड केलं होतं आणि आता ते व्हायरल झाले आहे.

'बसपन का प्यार' या गाण्याचा खरा गायक कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का? खरं तर, हे गाणं गुजरातमधील आदिवासी लोक गायक कमलेश बरोट यांनी गायलं आहे. हे गाणं 2018मध्ये बनवण्यात आलं होतं. मयूर नादिया यांनी संगीत दिलं आहे. याचे गीतकार पीपी बरिया आहेत. या गाण्याला 50 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.

कमलेशने माध्यमांना सांगितलं की, 'हे गाणे 2018 मध्ये बनवण्यात आलं होतं. यानंतर अहमदाबाद येथील मेषवा फिल्म्स नावाच्या कंपनीने त्याच्याकडून या गाण्याचे सगळे हक्क विकत घेतले. 2019मध्ये, मेषवा फिल्म्सच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज झालं.

आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना कमलेश म्हणाला, 'मी आतापर्यंत 6000 हून अधिक गाणी गायली आहेत. तो स्वतः अनेक गाण्यांचा लेखक आणि संगीतकार आहे. याशिवाय कमलेशने सहदेवचं कौतुकही केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्माने सहदेवचे कौतुक केलं होतं आणि म्हटलं होतं की हे गाणं दिवसभर तिच्या मनात फिरत राहतं.

निळ्या रंगाचा शर्ट घातलेला, सहदेव थेट कॅमेऱ्यात पाहतो आणि गाणं गातो. हा व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाला आहे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सहदेवला पुष्पहार घालून त्याचा सन्मान केला आहे.