दीपिका, सारा, श्रद्धापाठोपाठ ड्रग्स कनेक्शनमध्ये आणखी मोठ्या अभिनेत्रीचं नाव

NCB कडून होणार चौकशी 

Updated: Sep 22, 2020, 04:51 PM IST
दीपिका, सारा, श्रद्धापाठोपाठ ड्रग्स कनेक्शनमध्ये आणखी मोठ्या अभिनेत्रीचं नाव

मुंबई : सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि दीपिका पदुकोण पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीचं एनसीबीच्या रडारवर नाव आलं आहे. या अभिनेत्रीचं वय जवळपास ४० वर्षे असून या अभिनेत्रीने मोठा हिट सिनेमा दिला आहे. ही अभिनेत्री २००५, २००६ च्या काळातील आहे. 

NCB च्या सुत्राच्यां माहितीनुसार, अटकेत असलेल्या अनुज केशवानी आणि अंकुश या ड्रग्स पेडलर्स यांच्या चौकशीत या अभिनेत्रीचं नाव पुढे आलं आहे. या अभिनेत्रीची मॅनेजर तिच्यापर्यंत ड्रग्स पोहोचवत असेल. या अभिनेत्रीची मॅनेजर ड्रग्स पेडलर अनुजची गर्लफ्रेंड आहे.

२०१९ साली या अभिनेत्रीने ड्रग्स खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात मॅनेजरने ड्रग्स पेडलर्ससोबत दोनदा मिटिंग देखील केली होती. यामुळे येत्या काही दिवसांत अभिनेत्रीच्या मॅनेजरची चौकशी केली जाणार आहे. यानंतर या अभिनेत्रीला देखील NCB च्या चौकशीचा सामना करावा लागू शकतो. 

बॉलिवूडमधील दीपिका पादुकोणच्या 'हॅलोविन पार्टी'मध्ये ड्रग्जसह आता तीन आणखी नावे पुढे आले आहेत. सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर यांचं नाव पूढे आलं आहे. 28 ऑक्टोबर 2017 च्या रात्री त्याच ठिकाणी (कोको) हॅलोविन पार्टी झाली. 

दीपिकाचं नाव पुढे आल्यानंतर सोशल मीडियावर दीपिका ट्रोल होत आहे. तिच्या इंस्टाग्राम फोटोंवर लोक विविध प्रकारे कमेंट करत आहेत. दरम्यान, तिचा इन्स्टाग्रामचा एक जुना फोटोही व्हायरल झाला आहे, जो दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 19 नोव्हेंबर 2019 रोजी शेअर केला होता. या फोटोमध्ये ती पती रणवीर सिंगला 'सुपर ड्रग' म्हणत आहे. या फोटोमध्ये रणवीर आहे, पण त्याचा चेहरा दिसत नाही. दीपिकाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'आणि तू ... माय सुपर ड्रग'. एनसीबीच्या चौकशीत दीपिकाचे नाव समोर आल्यानंतर हा फोटो आता व्हायरल होत आहे.