एक साल में 10,208 किसानोंकी आत्महत्या, ट्रॅक्टर पर 13% ब्याज....'जवान'मधली संवाद देतायत खास मेसेज

Jawan Dialogues: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा बहुचर्चित जवान चित्रपट अखेर आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. शाहरुखच्या अभिनयाबरोबरच त्याच्या डायलॉग्जनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

राजीव कासले | Updated: Sep 7, 2023, 04:26 PM IST
एक साल में 10,208 किसानोंकी आत्महत्या,  ट्रॅक्टर पर 13% ब्याज....'जवान'मधली संवाद देतायत खास मेसेज title=

Jawan Dialogues: 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर....'  जवान चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी हा संवाद (Dialogues) प्रचंड व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर लोकांनी या डायलॉग्जचा संबंध आर्यन खान ड्रग्स प्रकरणाशी लावला. एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशी हा संवाद जोडण्यता आला. याला समीर वानखेडेंनीही उत्तर दिलं होतं. पण जवान चित्रपटातील केवळ हा एकच नाही तर इतर अनेक संवाद हिट होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून कॉर्पोरेट कर्जमाफीवर या संवादातून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. इतंकच नाही तर निवडणुकीत लोकांनी आपलं मत जात-पात किंवा धर्म पाहून देऊ नका असं आवाहनही या चित्रपटातून शाहरुख खानने (Shah Rukh Khan) केलं आहे. . 

जवान चित्रपटातील शाहरुखचे संवाद

- मैं हूं भारत का नागरिक। बार-बार नए लोगों को वोट देता हूं, लेकिन कुछ नहीं बदलता है।

- तुम्हारे एग्रीकल्चर मिनिस्टर रहते हुए पिछले एक साल में 10,208 किसानों ने आत्महत्या की है।

- यहां गरीब किसान के ट्रैक्टर पर 13 फीसदी बयाज है और अमीरों की मर्सिडीज पर सिर्फ 8 फीसदी।

- सिस्टम ने रातों-रात तुम्हारे बाप के 40,000 करोड़ माफ कर दिए और  मात्र 40,000 के लिए तुम्हारे इस सिस्टम ने इसके बाप के साथ पता है क्या किया।

- किसान की आत्महत्या पर 2 लाख रुपये देती है ये सरकार, इसलिए उसने अपनी जान ले ली।

- कश्मीर से लेकर कन्या कुमारी तक हर किसान की यही कहानी है।

प्रेक्षकांना आवाहन
अॅक्शन, रोमान्सबरोबरच या चित्रपटात देण्यत आलेल्या सोशल मेसेजमधून प्रेक्षकांना आवाहन करण्यात आलं आहे. आपलं मत देण्याआधी, पाच वर्षाचं सरकार निवडण्याआधी उमेदवारीच जात किंवा धर्म पाहू नका, तो पाच वर्षात तुमच्यासाठी काय करु शकतो हे पाहा असं आवाहन शाहरुखने केलं आहे. 

चित्रपट पहिल्याच दिवशी हिट
पठाण चित्रपटानंतर चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या शाहरुख खनच्या जवान चित्रपटाकडे. या चित्रपटाचं जबरस्त प्रमोशन करण्यात आलं. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली होती. या चित्रपटात शाहरुख खानबरोबरच अभिनेत्री नयनतारा, प्रिया मणी, सानया मल्होत्रा, अभिनेत्री सुनील ग्रोव्हर यांनी अभिनय साकारला आहे.  या चित्रपटामध्ये मनोरंजनासाठी आवश्यक असलेला सर्व मसाला यामध्ये आहे. हा चित्रपट म्हणजे शाहरुख खान आणि विजय सेतूपती या 2 दिग्गजांच्या अभिनयाची जुगलबंदी आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी रात्री 2 वाजताचेही शो आयोजित करण्यात आले होते.