close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ब्रेकअपनंतर जॅकलिन-साजिदच्या नात्याला पुन्हा नवे वळण

बॉलिवूडमध्ये कोणाचं ब्रेकअप कधी होईल आणि कधी कोणाचं सूत कोणासोबत जूळेल काही सांगता येत नाही.

Updated: Aug 20, 2019, 01:31 PM IST
ब्रेकअपनंतर जॅकलिन-साजिदच्या नात्याला पुन्हा नवे वळण

मुंबई : बॉलिवूडमध्ये कोणाचं ब्रेकअप कधी होईल आणि कधी कोणाचं सूत कोणासोबत जूळेल काही सांगता येत नाही. चाहत्यांना नेहमी सेलिब्रिटींच्या आयुष्यातील खासगी गोष्टी जाणून घेण्यास फार उत्सुकता असते. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि सिनेदिग्दर्शक साजिद खान यांच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच बहरत होत्या. पण कालंतराने त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला.

'हाऊसफुल २' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमधील नातं बहरत होते. पण काही गोष्टींच्या मतभेदानंतर त्याचे २०१३मध्ये अखेर ब्रेकअप झाले. दोघांमध्ये ब्रेकअप झाले असले तरी, साजिदची बहिण फराह खान आणि पती शिरीष कुंदर यांच्या सोबत जॅकलिनचे संबंध अद्यापही चांगले आहेत. 

त्यांच्या ब्रेकअपनंतर तिने फराह खान सोबत एका रिअॅलिटी डान्स शोचे परिक्षण सुद्धा केले होते. त्याचप्रमाणे ती शिरीष कुंदनच्या आगामी 'मिसेस सीरियल किलर' चित्रपटात झळकणार आहे. 

ब्रेकअपनंतरही तिने साजिदच्या कुटुंबियांसह संबंध टिकवून ठेवले आहेत. सध्या साजिद-जॅकलिनमधील जवळीक पुन्हा वाढताना दिसत आहे. डीएनएच्या वृत्तानुसार त्यांच्या नात्यामध्ये पुन्हा गोडवा निर्माण होत आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघे कायम एकमेकांच्या संपर्कात असतात. त्याचप्रमाणे 'मिसेस सीरियल किलर'च्या चित्रीकरणानंतर साजिद तिला तिच्या घरी सोडायला सुद्धा जात असतो.