मुंबई : बिहारमध्ये ‘सुपर ३०’ ची सुरूवात करणारे आणि प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांच्या बायोपिकसाठी अभिनेता हृतिक रोशन चांगलीच मेहनत घेत आहे. आज या सिनेमाचा पहिला लूक समोर आलाय.
बॉलिवूडचा हॅन्डसम हंक म्हणवला जाणारा हृतिक या सिनेमात वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. याआधी तो प्रत्येक सिनेमात दिसला त्यापेक्षा खूप वेगळा या सिनेमात तो दिसेल. कदाचित त्याच्या चाहत्यांना त्याच्या लूकवर विश्वासही बसणार नाही. आनंद कुमार यांनी एका मेसेजसह हा लूक शेअर केलाय. यात त्यांनी हृतिक रोशन आणि दिग्दर्शक विकास बहल यांचं कौतुक केलंय.
हृतिकने बनारसमध्ये आजपासून या सिनेमाचं शूटिंग सुरू केलंय. अशात हृतिकचा हा पहिला लूक समोर आला आहे. २२ जानेवारीपासून हृतिकने या सिनेमाचं शूटिंग सुरू केलं आहे.