दोन वर्षांपासून गायब असलेला हनी सिंग आला समोर...

रॅपच्या दुनियेचा बादशाह यो यो हनी सिंह पुन्हा परतलाय... होय, गेल्या दोन वर्षांपासून गायब असलेल्या हनी सिंगचा एक फोटो सोशल मीडियावर आलाय. 

Updated: Dec 23, 2017, 06:38 PM IST
दोन वर्षांपासून गायब असलेला हनी सिंग आला समोर...  title=

नवी दिल्ली : रॅपच्या दुनियेचा बादशाह यो यो हनी सिंह पुन्हा परतलाय... होय, गेल्या दोन वर्षांपासून गायब असलेल्या हनी सिंगचा एक फोटो सोशल मीडियावर आलाय. 

आपल्या गाण्यांनी आणि अॅटिट्युडनं लहानग्यांसहीत तरुणाईला वेड लावणारा हनी सिंह गेल्या अनेक दिवसांपासून फॅन्सच्या नजरेपासून दूर आहे.  

२०१५ मध्ये 'बायपोलर डिसऑर्डर' या मानसिक आजारानं त्रस्त झालेल्या हनीनं गाणं सोडलं होतं. नशेच्या सवयीमुळे हा आजार आणखीनच वाढला होता. त्यानंतर तो प्रदीर्घ काळ कॅमेऱ्यापासून दूर होता. परंतु, नुकताच हनी सिंहला एका पार्टीत पाहिलं गेलं. हनी सिंह या पार्टीत अभिनेता सूरज पांचोलीसोबत दिसतोय. या फोटोत हनीनं टोपी घातलीय...त्याचे मोठे केस टोपींतूनही दिसतायत. 

सोशल मीडियातून ट्विट करत मध्ये-मध्ये आपल्या प्रोजेक्टसबद्दल तो माहिती देत असतो. मिळालेल्या माहितीनुसार, हनी सिंह लवकरच आपल्या सुरांसहीत बॉलिवूडमध्ये परततोय. 

दोन वर्षांनंतर हनी सिंह पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये गाताना दिसणार आहे. हनी सिंहनं कार्तिक आर्यनच्या 'सोनू के टीटू की स्वीटी'साठी 'दिल चोरी साडा' गाणं गायलंय.... हे एक पार्टी साँग आहे.... पंजाबी गायक हंस राज हंसच्या एका गाण्याचं हे रिमेक साँग आहे. हे गाणं २६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

हनी सिंगनं लुंगी डान्स, चार बोतल वोडका, ब्लू आइजसारख्या गाण्यांतून लोकांना थिरकायला भाग पाडलंय.