Viral Video : ४ वर्षांच्या छोट्या तबलावादक देतोय मोठ्या बासरी वादकाला टक्कर

सध्या इंटरनेटवर अनेक छान-छान गोष्टी व्हायरल होत आहेत. त्यात एक छोट्या तबला वादकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ४ वर्षांचा हा चिमुरडा मोठ्या बासरीवादकांशी जुगलबंदी करत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 12, 2018, 04:45 PM IST

 

मुंबई :  सध्या इंटरनेटवर अनेक छान-छान गोष्टी व्हायरल होत आहेत. त्यात एक छोट्या तबला वादकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ४ वर्षांचा हा चिमुरडा मोठ्या बासरीवादकांशी जुगलबंदी करत आहे. 

हा अॅम्युचर व्हिडिओ Kids zone या यूट्यूब चॅनलने अपलोड केला आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने या व्हिडिओला पसंती मिळत आहे. अर्जुन अनासपुरे असे या छोट्या तबलावादकाचे नाव आहे. त्याला महेश काळे यांना गाण्याला साथ देण्याची इच्छा आहे.

या चिमुरड्याचा अॅटिट्यूट पाहण्यासारखा आहे.