Video : लालबागच्या मुलाला आलं पुण्याचं स्थळ; कांदे- पोह्यांच्या कार्यक्रमात जे घडलं ते एकदा पाहाच

तुमचाही कोणी मित्र आहे, का या लालबाग-परळच्या मंडळांमध्ये? त्यांना कमेंटमध्ये नक्की Tag करा.

Updated: Aug 29, 2022, 01:44 PM IST
Video : लालबागच्या मुलाला आलं पुण्याचं स्थळ; कांदे- पोह्यांच्या कार्यक्रमात जे घडलं ते एकदा पाहाच  title=
Ganeshotsav 2022 Kande Pohe Kothrud VS Lalbaug wedding proposal lalbaugcha raja Ganeshgalli

Ganeshotsav 2022 : सध्याचे दिवस गणेशोत्सवाचे असले, तरीही काहीजण मात्र गणरायाच्या आगमनासोबत आपल्या आयुष्याची घडीही व्यवस्थित बसू पाहत आहेत. या काहीजणांपैकीच एका जोडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आकर्षणाचा विषय आहे. हा विषय यासाठी आकर्षणाचा ठरतोय, कारण इथं थेट लालबागच्या मित्राला पुणे/ कोथरुडच्या मुलीचं स्थळ आलं आहे. (Ganeshotsav 2022 Kande Pohe Kothrud VS Lalbaug wedding proposal lalbaugcha raja Ganeshgalli)

गिळला ना तुम्हीही आवंढा? मुंबई आणि पुणे हे नातंच तसं आहे. काहीसं आंबटगोड, काहीसं तिखट, काहीसं बोचरं... अशाच एका नात्याचा पाया रचला जाण्यापूर्वीच त्यांच्या कांदे-पोह्यांच्या कार्यक्रमात नेमकं काय होतं, हे जाणून घ्यायचंय? तर Kande Pohe हा व्हिडीओ एकदा पाहाच.

भारतीय डिजिटल पार्टीकडून Kande Pohe संबंधिचे बरेच व्हिडीओ आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील. जिथे कोथरुडच्या मुलीसाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून मुलांची स्थळं येत असतात. पण, हा Kothrud VS Lalbaug व्हिडीओ यासाठी गाजतोय कारण इथे चर्चेत थेट दोन्ही ठिकाणांच्या गणेशोत्सवाची चर्चा सुरुये. 

आता मुंबईकरांसमोर पुण्याच्या (Pune Ganeshotsav) आणि पुणेकरांच्या गणेशोत्सवासमोर जर मुंबईच्या गणेशोत्सवाची चर्चा होऊ लागली तर काय होईल याची तुम्ही एकदा कल्पना कराच. कल्पना करणंही कठीण वाटत असेल तर, भाग्यश्री लिमयेनं साकारलेली पुणेरी तरुणी आणि समीर खांडकेकरनं साकारलेल्या काय भाई.... काय बोलतो... असं म्हणत जळीस्थळी काष्ठीपाषाणी लालबागचा गणेशोत्सव दिसणारा मुंबईकर मुलगा एकदा पाहाच. 

लालबाग- परळ (Lalbaug parel) भागातील तरुणांमध्ये या दिवसांत नेमका कसा उत्साह असतो आणि त्यांची कशी गडबड असते ते हा व्हिडीओ पाहताना दिसत आहे. शिवाय या मंडळींकडे गणपतीच्या दर्शनासाठी विनंती करणारे अनेकजण वर्षभर त्यांना तोंडही दाखवत नाहीत, हे वास्तवही Video तून दाखवण्यात आलं आहे. 

तुमचाही कोणी मित्र आहे, का या लालबाग-परळच्या मंडळांमध्ये? त्यांना कमेंटमध्ये नक्की Tag करा.