मुंबई : सुझान खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आजादला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात देखील आलं. काहीदिवसांपूर्वी दोघांना एका हॉटेलमध्ये डेट करताना स्पॉट करण्यात आलं. दोघे एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसले. पण आता हृतिक आणि सबाच्या नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. या व्यक्तीने तर हृतिकसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
सबा आणि हृतिकमध्ये आलेल्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव अभिनेत्री गायत्री भारद्वाज (Gayatri Bhardwaj). एका मुलाखती दरम्यान गायत्रीला कोणाला डेट करायला आवडेल आणि कोणासोबत लग्न करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचं उत्तर देताना गायत्री म्हणाली, 'मला अभिनेत्री सिद्धांत चतुर्वेदीला डेट करायला आवडेल. पण मला माहिती नाही, तो सिंगल आहे की नाही. पण मी त्याची फॅन आहे....'
लग्न करण्यासाठी गायत्रीने अभिनेता हृतिक रोशनचं नाव घेतलं आहे. ती म्हणाली, 'मला असं वाटतं हृतिक पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी तयार असेल. लहानपणापासून हृतिक माझा क्रश आहे. त्यामुळे मला हृतिकसोबत लग्न करायला आवडेल.'