Geeta Basra Nerborn Baby Name : हरभजन सिंहकडून बाळाचा पहिला फोटो, नाव शेअर

10 जुलै रोजी गीता बसराने दिला बाळाला जन्म 

Updated: Jul 26, 2021, 01:13 PM IST
Geeta Basra Nerborn Baby Name : हरभजन सिंहकडून बाळाचा पहिला फोटो, नाव शेअर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आणि क्रिकेटर हरभजन सिंहने आपल्या नवजात मुलाचं नाव शेअर केलं आहे. इंस्टाग्राम हँडलवर पहिला फोटो शेअर करत मुलाचं नाव सांगितलं आहे. या फोटोत हरभजन आणि गीताच्या मोठ्या मुलीसोबत मुलाचा फोटो शेअर केला आहे. (Geeta Basra Announces Her Newborn Baby Boy Name, Shared Harbhajan Singh boy picture ) 

10 जुलै 2021 रोजी गीता बसराने गोंडस मुलाला जन्म दिला. हरभजन सिंहने सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली. बाळ आणि गीता दोघंही सुखरूप असल्याचं सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

गीता बसरा आणि हरभजन सिंहने 29 ऑक्टोबर 2015 साली जालंधरमध्ये बिग फॅट पंजाबी लग्न केलं. 27 जुलै 2016 रोजी या दोघांना गोंडस पहिली मुलगी झाली. हिनाया (hinaya) असं या बाळाचं नाव. आता या दोघांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव शेअर केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

आज 26 जुलै रोजी गीताने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये हिनाया आणि दुसऱ्या मुलाचा फोटो पोस्ट केलाय. यामध्ये बाळाचं नाव जाहीर केलं आहे. जोवन वीर सिंह प्लाहा (Jovan Veer Singh Plaha) असं या बाळाचं नाव आहे. "Introducing HEER ka VEER... Jovan Veer Singh Plaha." असं कॅप्शन देत हा फोटो पोस्ट केलं आहे.