नक्की काय चाललंय...! मलायकामुळे झालं जॉर्जिया अरबाजचं ब्रेकअप?

बॉलिवूडमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानचं गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झालं आहे. ब्रेकअपनंतर जॉर्जियाने एका मुलाखतीत हे दोघं वेगळं होण्याचं कारण सांगितलं आहे. 

Updated: Dec 13, 2023, 12:03 PM IST
नक्की काय चाललंय...! मलायकामुळे झालं जॉर्जिया अरबाजचं ब्रेकअप?  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानचं गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झालं आहे. ब्रेकअपनंतर जॉर्जियाने एका मुलाखतीत हे दोघं वेगळं होण्याचं कारण सांगितलं आहे. अशीही चर्चा आहे की, या दोघांच्या ब्रेकअपमागे मलायका आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला या दोघांच्या ब्रेकअपमागचं कारण सांगणार आहोत. 

ई-टाइम्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जॉर्जियाने त्यांच्या ब्रेकअपमागचं कारण सांगितलं आहे. तिच्या ब्रेकअपविषयी बोलताना जॉर्जिया एंड्रियानी म्हणाली, आम्हा दोघांनाही माहित होतं की, आम्ही कधीच जास्त काळ एकत्र राहू शकत नाही. 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मला त्याची आठवण येते हे उघड आहे. आमच्यात अजूनही मैत्रीचं नातं आहे, पण मला आता पुन्हा त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये रहायचं नाही. मी याबद्दल बोलत आहे कारण माझी स्वतःची ओळख आहे, लोकांनी मला अरबाजची गर्लफ्रेंड म्हणून ओळखावं असं मला अजिबात वाटत नाही. मी आता ज्या ठिकाणी आहे खूप चांगल्या ठिकाणी आहे.

सध्या आमच्यात खूप छान मैत्रीचं नातं आहे.आम्ही नेहमीच एकमेकांसोबत खूप घट्ट मैत्रीचं नातं शेअर करतो. तेव्हा जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. आमचं खूप जवळचं नातं होतं. आमचे एकमेकांसोबत अनेक अविस्मरणीय क्षण आहेत. खूप जवळ आल्यानंतर मित्र बनणं खूप आव्हानात्मक आहे. मात्र काहीवेळा नात्यात अडकून राहण्यापेक्षा त्यातून बाहेर पडणं कधीही चांगलं.

काही दिवसांपुर्वी असंही म्हटलं जात होतं की,  जॉर्जिया आणि अरबाजच्या ब्रेकअपचं कारण मलायका होती. या दोघांची मैत्री अरबाज जॉर्जियाच्या नात्याआड येत होती असंही म्हटलं जात होतं.  मात्र काही दिवसांपुर्वी जॉर्जियाने या सगळ्या बातम्या फेटाळून लावल्या या विषयी बोलताना जॉर्जिया म्हणाली, घटस्फोटानंतर अरबाज आणि मलायकायांच्या बाँडचा आमच्या नात्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. मलायकासोबत त्याचं जे नातं होतं ते माझ्या नात्याच्या आड कधीच आलं नाही.
 
गेले ४ वर्ष अरबाज आणि जॉर्जिया रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या वयात जवळ-जवळ २२ वर्षांचं अंतर आहे. अरबाजचं वय ५६ वर्ष आहे. तर जॉर्जिया ३४ वर्षांची आहे. अरबाज या दिवसांतर बिग बॉस १७ मध्ये त्याचा भाऊ सोहेलसोबत होस्टिंग करताना दिसत आहे.