'20 कोटी देते, माझ्यासोबत संसार थाट', बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयला लग्नाची मागणी

 कार्तिकही थांबला नाही आणि मजेशीर उत्तर देत त्याने लिहिले, कधी?

Updated: Mar 10, 2022, 07:19 PM IST
 '20 कोटी देते, माझ्यासोबत संसार थाट', बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयला लग्नाची मागणी title=

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कार्तिक आर्यन हा देखील त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. अलीकडेच, कार्तिकने इंस्टाग्राम हँडलवर त्याच्या छोट्या सहकलाकारासह एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ज्यामध्ये बालकलाकार त्याच्या चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे. कार्तिकने हा व्हिडिओ शेअर केल्यावर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया या व्हिडिओवर येताना पाहायला मिळत आहेत

एका चाहत्याने कमेंटमध्ये कार्तिकला लग्नाची मागणी घातली आहे आणि लिहिले, कार्तिक माझ्याशी लग्न कर, त्या बदल्यात मी तुला 20 कोटी देईन. कार्तिकही थांबला नाही आणि मजेशीर उत्तर देत त्याने लिहिले, कधी?

अनेक मुली या कार्तिकवर फिदा आहेत. प्यार का पंचनामा चित्रपटात काम केल्यानंतर त्याचं मोठं फॅन फॉलोविंग तयार झालं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटानंतर कार्तिक खूप लोकप्रिय झाला आणि तो यंग जनरेशनचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जावू असतं. यानंतर कार्तिकने प्यार का पंचनामा 2, सोनू के टीटू की स्वीटीसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

सध्या कार्तिक शहजादा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच त्याने दिल्लीत चित्रपटाचे शेड्यूल पूर्ण केले आहे.