Happy Birthday Abhishek Bachchan : ...म्हणून ज्युनिअर बच्चनच्या 'या' भूमिकेची गिनीज बुकमध्ये नोंद

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज ४२ वर्षांचा झाला. ५ फेब्रुवारी १९७६ मध्ये जन्मलेल्या अभिषेकने 'रेफ्यूजी' सिनेमात आपले डेब्यू केले.

Updated: Feb 5, 2019, 11:29 AM IST
Happy Birthday Abhishek Bachchan : ...म्हणून ज्युनिअर बच्चनच्या 'या' भूमिकेची गिनीज बुकमध्ये नोंद title=

मुंबई:  बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज ४२ वर्षांचा झाला. ५ फेब्रुवारी १९७६ मध्ये जन्मलेल्या अभिषेकने 'रेफ्यूजी' सिनेमात आपले डेब्यू केले. अभिषेकचा पहिला सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगली कामगिरी करु शकला नाही. पण समीक्षकांनी अभिषेकच्या अभिनयाला विशेष दाद दिली. जेष्ठ अभिनेते यांचे पुत्र असल्यामुळे त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी होती. 'पा' सिनेमात अभिषेकने बिग बिंच्या वडीलांची भूमिका साकारली होती. 'पा' सिनेमासाठी अभिषेकचे नाव गिनीज वर्ल्ड रोकॉडमध्ये नोंनदविण्यात आले.सलग चार वर्षे अभिषेकचे १७ सिनेमे बॉक्सऑफिसवर अपयशीच ठरले त्यानंतर २००७ साली आलेल्या 'धूम' सिनेमाने बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली.

'धूम 2' सिनेमा दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील नाते बहरले. अभिषेकने 'गुरु' सिनेमाच्या सेटवरील खोट्या अंगठीने ऐश्वर्याला प्रपोज केले. 'गुरु' सिनेमात एकत्र काम केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २० एप्रिल २००७ ऐश्वर्या आणि अभिषेक लग्न बंधनात अडकले. तेव्हा ऐश्वर्या ३३ आणि अभिषेक ३१ वर्षांचा होता. दोघांना आता ६ वर्षांची एक मुलगी आराध्या आहे. ऐश्वर्याने पती अभिषेकला वाढदिवसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत अभिषेकला 'बेबी' म्हणून कॅप्शन दिले आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

always...My BabyHAPPY HAPPY BIRTHDAY BAAABYYY

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

 

'रेफ्यूजी' सिनेमानंतर अभिषेकने 'बंटी और बबली', 'युवा', 'ब्लफमास्टर', 'गुरु' आणि 'दोस्ताना' यांसारख्या धमाकेदार सिनेमात आपली उल्लेखणीय कामगिरी बजावली. काही दिवसांपूर्वी अभिषेकने एक खुलासा केला होता, अभिनय क्षेत्रात फ्लॉप होणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट आहे.