Happy Birthday Milind Soman : जीवनात फक्त आणि फक्त फिटनेसला महत्त्व देणारा अभिनेता आणि मॉडेल म्हणजे मिलिंद सोमण (Milind Soman). मिलिंद कायम त्याच्या फिटनेसमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर मिलिंद चाहत्यांना देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत फिट राहण्यासाठी टिप्स (Milind Soman fitness tips) देत असतो. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. आज मिलिंद पत्नी अंकितासोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. पण अनेक मुलींना डेट केल्यानंतर वयाच्या 52 व्या वर्षी Milind Soman ने 24 वर्षीय अंकितासोबत लग्नगाठ बांधली. (Milind Soman love life)
'या' मुलींची देखील मिलिंदच्या आयुष्यात एन्ट्री झाली, पण त्यांपैकी कोणासोबतही मिलिंदचं लग्न झालं नाही.
मधू सप्रे (Madhu Sapre)
मधू सप्रे आणि मिलिंद यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मधु मिस युनिवर्स पेजेंट 1992 ची दुसरी रनरअप होती. मिलिंद आणि मधूने त्यांचं नातं सर्वांसमोर मान्य देखील केलं. शिवाय दोघे मुंबईमध्ये लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते. न्यूड पोज दिल्याच्या वादावरुन दोघांमध्ये वाद झाले. अखेर 1995 साली त्यांनी विभक्त होणाचा निर्णय घेतला.
Mylene Jampanoi
व्हॅली ऑफ फ्लाव्हर्स सिनेमातून मिलिंद आणि Mylene Jampanoi यांची ओळख झाली. पहिल्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी 2006 साली गोव्यात मोठ्या उत्साहात लग्न देखील केलं. पण त्यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. अखेर 2009 साली त्यांचा घटस्फोट झाला.
शाहाना गोस्वामी (Shahana Goswami)
घटस्फोटानंतर मिलिंदने शाहाना गोस्वामीला डेट करण्यास सुरुवात केली. दरम्यान दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. मिलिंद आणि शाहाना यांच्या वयात 21 वर्षांचं अंतर होतं. महत्त्वाचं म्हणजे घटस्फोटानंतर मिलिंद आणि शाहाना यांचं नातं तीन वर्ष टिकलं.
दीपानीता शर्मा
दीपानीता शर्मा आणि मिलिंद यांची जोडी 'जोडी ब्रेकर्स' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमात दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. पण खऱ्या आयुष्यात मात्र त्यांचं ब्रेकअप झालं.
गुल पनाग (Gul Panag)
2005 साली गुल पनाग आणि मिलिंद यांच्या नात्याला झाली. पण त्याचं नात फार काळ काही टिकू शकलं नाही. अखेर त्यांनी विभक्तच होण्याचा निर्णय घेतला.