दीपिका असं मिटवणार रणबीरचं नाव!

सध्या बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदूकोण पुन्हा एकदा चर्चेत आलीय आणि त्याचं निमित्त ठरतंय ते बॅण्डेज.

Updated: Feb 22, 2018, 10:55 PM IST
दीपिका असं मिटवणार रणबीरचं नाव!

मुंबई : सध्या बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदूकोण पुन्हा एकदा चर्चेत आलीय आणि त्याचं निमित्त ठरतंय ते बॅण्डेज. दीपिका आणि रणबीर कपूरचं प्रेम बहरत होतं तेव्हा दीपिकाने मानेवर आर के असा टॅट्यू कोरून घेतला होता.

ब्रेकअप झाल्यानंतरही दीपिकाने हा टॅट्यू तसाच ठेवला होता. मात्र सध्या दीपिकाने या टॅट्यूवर बॅण्डेज लावलंय. अशी चर्चा आहे की, नुकतीच तिने टॅट्यूची सर्जरी केली आहे आणि म्हणूनच तीने त्यावर बॅण्डेज लावलंय. रणबीर कपूरचं नाव आता कायमचं मिटवून टाकायचं जणू दीपिकाने ठरवलंय.