#METOO DIRECTOR IN BIG BOSS 16: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे बिग बॉस 16 ची (Television Popular Show Bigg Boss 16). सलमान खानच्या या सुपरहीट शोची सर्वत्र हवा आहे. आता या नव्या सिझनमध्ये कोण कोण सुपरस्टार येणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. आतापर्यंत अनेक नामांकित सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत आणि आता बातमी आहे की चित्रपट निर्माता साजिद खान या शोमध्ये भाग घेणार आहे. (director producer sajid khan big boss 16 participant he was caught under me too controversy) फिल्ममेकर साजिद खान (Sajid Khan) वर नवीन आरोप लावण्यात आले होते आहेत. MeToo च्या आरोपानंतर साजिद पूर्णपणे प्रसिद्धीपासून दूर आहे.
साजिद खानने अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत पण MeToo दरम्यान त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर तो अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला. एक नव्हे तर अनेक महिला सेलिब्रिटींनी साजिद खानवर लैंगिक छळ केल्याचे आरोप केले होते. मंदाना करीमी (Mandana Karimi), सलोनी चोप्रा (Saloni Chopra), रेचेल व्हाईट (Rachel White) अशा अनेक महिलांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले होते.
या प्रकरणानंतर फिल्म असोसिएशनने (film association) साजिदवर बंदी घातली होते तसेच अनेक कलाकारांनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. अक्षय कुमार (AKSHAY KUMAR) आणि रितेश देशमुख (RITEISH DESHMUKH) सारख्या मोठ्या कलाकरांनीही त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. तेव्हापासून साजिद मीडिया आणि लाईमलाईटपासून दूर होता. साजिद खानची बहीण फरान खानही मोठी कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका आहे.
अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ने साजिदवर आरोप केला होता कि एका भेटीदरम्यान त्याने आपला प्रायव्हेट पार्ट (PRIVATE PART) बाहेर काढून तिच्यासोबत अत्यन्त चुकीचं कृत्य केलं होत .
आता या सिझन मध्ये साजिद खान स्वतःला कशा प्रकारे प्रूव्ह करतो हे पाहून महत्वाचं असणार आहे.